संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर शहरातील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या श्री स्वामी विवेकानंद पी.यू.काॅलेजच्या मंत्रीमंडळाचा शपथ विधी समारंभ व जिमखाना उदघाटन सोहळा शुक्रवारी दि.७ रोजी सकाळी ११ वाजता माणिकराव देशपांडे सभागृहात आयोजित करण्यात आले आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष अँड.चेतन मणेरीकर उपस्थित राहतील.
तर प्रमुख पाहुणे खानापूर तालुक्याचे आमदार उपस्थित राहतील.संस्थेचे सचिव सुहास कुलकर्णी सहभागी उपस्थित राहणार आहेत.
यावेळी काॅलेजचे विद्यार्थी, काॅलेज मंत्रीमंडळ सदस्य,जिमखाना सदस्य,प्राचार्य,प्राध्यापक ,कर्मचारीवर्ग तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
तरी कार्यक्रमास विद्यार्थी, पालक,माजी विद्यार्थी, शिक्षण प्रेमी आदी मान्यवरानी मोठ्या संख्येने उपस्थित राहुन कार्यक्रमाची शोभा वाढवावी.असे आवाहन काॅलेजच्यावतीने करण्यात आले आहे.
