
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर शहरातील तहसील कार्यालयात सालाबाद प्रमाणे यंदाही शासकीय पध्दतीने कृष्णराज वड्डेयर यांची जयंती बुधवारी दि.४ रोजी साजरी करण्यात आली.
यावेळी उपतहसीलदार के आर कोलकार यांनी कृष्णराज वड्डेयर यांच्या फोटो प्रतिमेचे पुजन केेले.
तर व्ही.आर.मॅगेरी यांनी दीपप्रज्वलन करून पुजन केले.यावेळी राकेश बुवा याच्याहस्ते कृष्णराज वड्डेयर यांच्या फोटो प्रतिमेला पुष्पहार घालुन पुजन करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाला तहसील कार्यालयाचे उपतहसीलदार के.आर.कोलकार, प्रकाश कट्टीमणी, व्ही.आर.मॅगेरी, मंजू संगमणावर, विनायक मडीवार,सुनिल देसाई, मोशीन दर्गावाले, श्री जवळी, श्री विनायक,मंजू संगमण्णावर,सादिक पाश्चापूरे आदी उपस्थित होते.