#शेतकरी हुतात्मा दिनीच दुदैवी घटना घडली!

संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
कक्केरी ( ता . खानापूर ) येथील शेतकरी मल्लया दुंडय्या हिरेमठ ( वय,५३) यांचा कृषी तलावात पडुन मृत्य झाल्याची घटना मंगळवारी दि.२१ रोजी घडली.
या बाबत घडना स्थळावरून मिला ले ली माहिती अशी की, शेतकरी मल्लया हिरेमठ हे नेहमी प्रमाणे मंगळवारी शेतात गेले होते.शेतातील कृषी तलावाच्या काठावरील वाढलेले गवत व कचरा काढताना त्याचा पाय घसरला व ते कृषी तलावात पडले, त्याना पोहता नसल्याने त्याचा तलावात बुडून मृत्यू झाला.
त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी,एक मुलगा, असा परिवार आहे.
मल्लया हिरेमठ हे कुटूंबाचा आधार होता. याशिवाय सरकारी बॅक तसेच कृषी पतसंस्थेकडुन घेतलेले लाखो रूपयाचे पीक कर्ज त्यांच्या नावावर आहे.
कुटुंब प्रमुखाचा आधार हरपल्याने हिरेमठ कुटूंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे,
शेतकरी हुतात्मा दिनीच ही दुदैवी घटना घडल्याने कक्केरी परीसरातुन हळहळ व्यक्त होत आहे.

