#केवळ ३ महिण्यातच निकृष्ट दर्जाच्या कामाचा नमुना! प्रवाशांंचे हाल!
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
खानापूर तालुक्यातील हलशीवाडी ते हलशी पर्यतच्या रस्त्याची दुरावस्था झाल्याने केवळ तीन महिण्यात निकृष्ट दर्जाच्या कामाचा नमूना जनतेसमोर दिसुन आला. त्यामुळे नागरीकातुन नाराजी
पसरली आहे.
हलशीवाडी ते शिवाजी हायस्कूल पर्यतच्या रस्त्यावरील डांबरच गेल्याने जागोजागी खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहन धारकाना व प्रवाशाना याचा त्रास सहन करावा लागत आहे.यावरून निकृष्ट दर्जाचे काम असल्याचे दिसुन येत असुन या कामाची चौकशी व्हावी.अन्यथा रास्तारोको इशारा नागरीकानी दिला आहे.
हलशी ते गुंडपी पर्यतच्या रस्त्यासाठी १ कोटीचा निधी मंजुर करून खानापूर तालक्याच्या आमदारांच्याहस्ते कामाचा शुभारंभ करण्यात आला आहे. परंतु केवळ तीन महिण्यातच पावसाच्या सुरूवातीलाच डांबरीकरण रस्त्याची अशी दुरावस्था झाल्याने कामाच्या दर्जाबाबत नागरीकातुन नाराजी व्यक्त झाली आहे.
यारस्त्यावरील डांबर खडी पावसाच्या पाण्याबरोबर वाहुन गेल्याने अनेक ठिकाणी खडी विखुरल्याने दुचाकी स्वाराना जीव मुठीत घेऊन ये जा करावी लागत आहे.तर दुचाकी घसरून पडण्याचे प्रकार घडत आहेत.
सध्या या रस्त्याची डागडुजी झाली नाहीतर
येत्या पावसात रस्ता पूर्ण पणे खराब होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.तेव्हा सार्वजनिक बांध काम खात्याने लागलीच रस्त्याची दुरूस्ती करून घ्यावी.अशी मागणी नागरीकातुन होत आहे.
याजबरोबर निकृष्ट दर्जाच्या कामाची चौकशी व्हावी.संबधीतावर कारवाई व्हावी.अन्यथा उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा हलशीवाडी ग्रामस्थानी दिला आहे.
