नगरपंचायतीला निवेदन
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
खानापूर शहरातील पतंजली योगाअभ्याचे वर्ग वनखात्याच्या पटागणांवर होत होते.परंतु सध्या पावसाला सुरूवात होत असल्याने वनखात्याच्या उघडया पटांगणावर पतंजली योगा अभ्यासाचे वर्ग होत नाही.तेव्हा खानापूर नगरपंचायतीच्या रेल्वे स्टेशन जवळील समुदाय़ भवनात पतंजली योग अभ्यासाच्या वर्गाची सोय व्हाय.अशा मागणीचे निवेदन नगरपंचायच्या अधिकारी सौ.राजेश्री वेर्णेकर याना खानापूर पतंजलि योगा यांच्यावतीने देण्यात आले.
यावेळी अँड.सुभाष देशपांडे, बाॅन्डरायटर शामराव पाटील, माजी नगरसेवक नारायण ओगले, सौ.विणा शंकर सुळकर,
सौ.विद्याभारती सुरेश पाटील,सौ.अनुराधा सुदर्शन सुळकर,सौ.सुनिता दत्तात्रय गुरव,सौ.सुरेखा फकिरा पाटील आदी उपस्थित होत्या.