संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर तालुका डॉक्टर्स असोसिएशनतर्फे डॉक्टर्स डेच्या निमित्ताने खानापूर तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. महेश किवडसन्नावर यांचा सत्कार सोहळा नुकताच करण्यात आला.
यावेळी खानापूर तालुका डॉक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. डी.ई. नाडगौडा यांनी पुष्पगुच्छ, हार व शाल आर्पन करून त्यांचा गौरव केला.
यावेळी खानापूर तालुका डाक्टर असोसिएशनचे अध्यक्ष डाॅ.डी.ई.नाडगौडा म्हणाले कि, खानापूर तालुक्याला लाभलेले तालुका आरोग्य अधिकारी डाँ.महेश किवडसन्नावर हे लोकप्रिय तालुका अधिकारी आहेत.तालुक्याच्या जनतेची सेवा चांगल्या प्रकारे व्हावी.तालुक्यात कोणत्याच रोगाचा प्रसार होऊ नये. खेड्यापाट्यात रूग्णाची सेवा व्हावी.
यासाठी सातत्याने कार्यरत असतात.
सरकारी दवाखाण्यात रूग्णाची सोय व्हावी.वेळेत उपचार व्हावे. गरीबाना योजनाचा लाभ व्हावा.यासाठी ते नेहमी धडपडत असतात. असे प्रामाणिक तालुका आरोग्य अधिकारी डाॅ.महेश किवडसन्नावर याना डाॅक्टर दिनाच्या शुभेच्छा देऊन त्याचा सत्कार करणे हे आम्हा खानापूर तालुका डाॅक्टर असोसिएशन भाग्य आहे. असे मत व्यक्त केले.
कार्यक्रमात आरोग्य विभागाच्या माध्यमातून तालुक्यात दिल्या जाणाऱ्या उल्लेखनीय सेवांबद्दल तालुका आरोग्य अधिकाऱ्यांचे कौतुक करण्यात आले. डॉक्टरांच्या कार्याला समाजात अत्यंत महत्त्वाचे स्थान असून, आरोग्यसेवेत योगदान देणाऱ्या सर्व डॉक्टरांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
यावेळी डॉ. सुदर्शन सुळकर तसेच असोसिएशनचे सचिव डॉ. सागर नार्वेकर उपस्थित होते.
यावेळी तालुका आरोग्य कार्यालयाचे डाॅक्टर व कर्मचारी उपस्थित होते.