संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
छत्रपती शाहू प्रकाशन मंडळ, बेळगाव व राज्य मराठी विकास संस्था, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, दि. २१ जून २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धेत जवळ जवळ १० माध्यमिक विद्यालयानी सहभाग घेतला होता. यामध्ये बेळगाव येथील टिळकवाडी हाय़स्कूलचा विद्यार्थी व खैरवाड गावचा परशु कोलेकर यांचा चिरंजीव कुमार पुष्कर परशराम कोलेकर यांनी मराठी भाषा निबंध स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकवून उल्लेखनीय यश संपादन केले.
यावेळी बृहन्महाराष्ट्र मंडळातर्फे नितीन कपिलेश्वरकर, सह को साध्य परशराम माळी, विभागीय कार्यवाह निबंध केंद्र प्रमुख प्रभाकर हलगेकर, कुमार पाटील, शिवराज पाटील,विलास पेडणेकर आदी उपस्थित होते.
