संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
राष्ट्रीय पल्सपोलिओ लसीकरण कार्यक्रम ऱविवारी दि.२८ रोजी खानापूर शहरसह तालुक्यात उत्साहात राबविण्यात येणार आहे.
यामोहिमे अंतर्गत पाच वर्षाखालील प्रत्येक बालकाला पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब देण्यात येणार असुन पालकानी
आपल्या बालकाना जवळच्या पल्स पोलियो केंद्रावर आणून लसीकरण करूण घ्यावे.असे आवाहन तालुका आरोग्य विभागाने केले आहे.
तालुक्यात एकूण १६,१८० बालकाना पोलिओचे डोस देण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे.त्यासाठी १३५ लसीकरण केंद्र आणि २८३ पथके कार्यरत राहणार आहेत .
या मोहिमेतुन एक ही बालक पोलिओ लसीपासुन वंचित राहू नये, यासाठी नागरीकानी तसेच पालकानी सहकार्य करावे.असे आवाहन खानापूर तालुका आरोग्य अधिकारी डाॅ महेश किवडसन्नावर यानी केले आहे.
