#आपघात होण्याआधी स्पीडब्रेकरची सोय करा!
खानापूर प्रतिनिधी
खानापूर पारिश्वाड रोडवरील बरगाव क्राँसवर स्पीड ब्रेकर नसल्याने वाहने बेफानवेगाने धावतात,त्यामुळे बरगाव क्राॅसवर आपघात होण्याचा संभव असतो.
तेव्हा सार्वजनिक बांधकाम खात्याने खानापूर पारिश्वाड रोडवरील बरगाव क्राॅसवर लवकरात लवकर स्पीड ब्रेकरची व्यवस्था करावी.म्हणजे भविष्यात होणारे आपघात वेळीच टळतील.
याक्राॅसवरून खानापूरमार्गे दोड्डहोसुर, देवलती, पारिश्वाड, गंदिगवाड,इटगी गावचे प्रवाशी, तसेच बसेस मोठ्या प्रमाणात येजा करतात. तर याच क्राॅसवरून बरगाव, भंडरगाळी, सन्नहोसुर, निडगल, गर्लगुंजी आदी गावचे प्रवाशी, तसेच बसेस व वाहने ही मोठ्याप्रमाणात ये जा करतात.
तेव्हा बरगाव क्राॅसवर नेहमीच गर्दी असते.तेव्हा बरगाव क्राॅस वर स्पीड ब्रेकरची व्यवस्था करावी.
खानापूर तालुक्याचे आमदार नेहमीच खानापूर पारिश्वाड रोडवरील बरगाव क्राॅस येथून ये जा करतात.तेव्हा आमदारानी याठीकाणी स्पीड ब्रेकरची व्यवस्था करण्यासाठी प्रयत्न करावे.
व भविष्यात होणारे आपघात टाळावे.अशी मागणी याभागातील प्रवाशीवर्गातुन तसेच नागरीकातुन होत आहे.
प्रतिक्रिया!
खानापूर पारिश्वाड रोड वरील बरगाव क्राॅसवरून नेहमीच ये जा करतो.बरगाव क्राॅस वर स्पीड ब्रेकर नसल्याने वाहने बेफान वेगाने ये जा करतात.त्यामुळे याठिकाणी केव्हा आपघात होईल याचा नेम नाही.तेव्हा बरगावक्राॅस वर स्पीड ब्रेकरची सोय होने गरजेचे आहे.
जे.पी.पाटील, शिक्षक