#खानापूरात स्वामी विवेकानंद पी.यू महाविद्यालयात फ्रेशर्स डे साजरा!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी.
विद्यार्थ्यानी अभ्यासात कष्ट, जीद्द ठेवून सातत्याने अभ्यास केला.तर जीवणात नक्की यशस्वी व्हाल.यासाठी नेहमी मनाची जीद्द मोठी पाहिजे. विद्यार्थी जीवनात कठोर परीश्रम घेऊन यश संपादन केले.पुढे जीवनात आनंदाने जगता येते.यामागे आई वडीलाना आनंद प्राप्त होतो.तेव्हा आतापासुन अभ्यासात कठोर परीश्रम यशस्वी असे विचार जी एस एस काॅलेजचे प्राध्यापक प्रणव पित्रे यानी खानापूर शहरातील श्री स्वामी विवेकानंद कला,वाणिज्य,व विज्ञान पी यु महाविद्यालयात विद्यार्थ्याच्या स “फ्रेशर्स डे” कार्यक्रमात प्रमुख पाहुणे यानात्याने बोलताना व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्ंस्थेचे चेअरमन अँड.चेतन मणेरीकर उपस्थित होते
यावेळी त्यानी आपल्या शालेय जीवनातील अनुभव सांगीतला. व विद्यार्थ्याना परीक्षेला कसे सामोरे जावे.याबद्दल माहिती दिली.
कार्यक्रमाची सुरूवात दीप प्रज्वलन व फोटो पुजनाने झाली. यावेळी व्यासपीठावर विशेष उपस्थिती संस्थेचे सचिव सुहास कुलकर्णी, अँड मदन देशपांड, प्राचार्य पी के चापगावकर, उपप्राचार्य एस एस पाटील ,प्राचार्य विनोद मराठे आदी उपस्थित होते.
यावेळी प्राचार्य पी के चापगावकर यानी प्रास्ताविक करून उपस्थितांचे स्वागत केले.
तर प्रमुख पाहुणे प्रा.प्रणव पित्रे यांचा परिचय उपप्राचार्य एस एस पाटील यानी करून दिला.तर चेअरमन अँड चेतन मणेरीकर यांचा परिचय विद्यार्थीनीने करून दिला.
यावेळी फ्रेशर्स जे निमित्त प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यानी आपले मनोगत मांडले.
तसेच पाहुण्यांची भाषण झाली.
कार्यक्रमाचे औचित्य साधुन प्रा.प्रणव पित्रे यांचा शाल पुष्पगुच्छ व भेट वस्तु देऊन सत्कार केला.
तसेच उपप्राचार्य एस एस पाटील लॅब साठी ३२ हजार रूपयाची देणगी देऊ केली,
.यानिमित्त त्याचाही शाल पुष्पगुच्छ ,
श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी अध्यक्षीय भाषणात बोलताना चेअरमन अँड.चेतन मणेरीकर म्हणाले की, कष्टाशिवाय फळ कठोर अभ्यासाशिवाय यश नाही.विद्यार्थ्यानी काॅलेजजीवनात कष्ट व जीद्द ठेवून अभ्यासात मेहनत केली.तुम्ही यशस्वी व्हाल. भविष्यात चांगले जीवन जगाल.असे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाला संस्थेचे संचालक मंडळ,प्राध्यापक,कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी आभार महाविद्यालय संघाच्या अध्यक्षा सौ उज्वला बाचोळकर यानी मानले.

