पत्रकार परिषदेत माहिती!
#१ जून रोजीआशिर्वाद हाॅस्पिटल ,श्री आर्थो व ट्राॅमा युनिट तसेच खानापूर डाॅक्टर्स असोसिएशन वतीने आयोजित!
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर (सुहास पाटील )
खानापूर तालुक्यातील गरीब व गरजू रूग्णासाठी वेळीच आजाराची तपासणी व्हावी.व त्याच्यावर उपचार व्हावे.या उद्देशाने
खानापूर शहरातील रेल्वेस्टेशन रोड वरील आशिर्वाद हाॅस्पिटल येथे दि.१ जुन रोजी सकाळी १० ते दुपारी ४ वाजेपर्यत आशिर्वाद हाॅस्पिटल ,श्री आँर्थो आणि ट्राॅमा सेंटरचे युनिट तसेच खानापूर डाॅक्टर्स असोसिएशन यांच्यावतीने मोफत मेगा आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती डाॅ. डी. ई.नाडगौडा यानी गुरूवारी आशिर्वाद हाॅस्पिटलमध्ये बोलविण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत माहिती दिली.
यावेळी डाॅ.देवगौडा आय. ( आँर्थोपेडिक व स्पाईन सर्जन) उपस्थित होते. यावेळी बोलताना ते म्हणाले की खानापूर तालुक्यातील जनता गरीब आहे. मोठ्या आजाराना घाबरून ते वेळेत उपचाराला येत नाही. त्यावेळी शेवटच्या घटकेला उपचारासाठी डाॅक्टराला विनवनी करतात. हा गैर समज दुर होण्यासाठी आशिर्वाद हाॅस्पिटल मध्ये मोफत मेगा आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले.
याशिवाय आपघातग्रस्थासाठी हरिश योजनाचा लाभ ही आशिर्वाद हाॅस्पिटल मधुन मिळणार आहे. त्याच बरोबर
आशिर्वाद हाॅस्पिटलकडुन विविध सुविधाचे व योजनाचे मार्गदर्शन!
सुविधा :
हाडे व सांधे फँक्चर शस्त्रक्रिया, पाठदुखी व मणक्याची शस्त्रक्रिया,सामान्य शस्त्रक्रिया,सामान्य औषध,अल्ट्रासाऊंड स्कॅनिंग ,डेकेअर उपचार,डिजिटल एक्सरे,ईसीजी,प्रयोग शाळा,फाॅर्मसी, रूग्णवाहिका सेवा आदी.
# शासकीय व खाजगी योजना:
यशस्विनी आरोग्यसेवा,धर्मस्थळ आरोग्य सेवा,आयुष्यमान भारत आरोग्य कर्नाटक, बीपीएल,एपील कार्डधारकासाठी हरिश योजना,अपातग्रस्थासाठी योजना आदी.
तरी याशिबीराचा लाभ घ्यावा .असे आवाहन आशिर्वाद हाॅस्पिटल,श्री आर्थो व ट्राॅमा युनिट तसेच खानापूर डाॅक्टर्स असोसिएशनच्या वतीने कळविण्यात आले आहे.