#विद्यार्थ्याना पुस्तकांचे वाटप!
खानापूर प्रतिनिधी
खानापूर शहरातील मराठा मंडळ हाय्यर सेंकडरी स्कूल मध्ये सोमवारी दि१ जुन रोजी शाळा प्रारंभोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला.
सुरुवातीला विद्यार्थ्यांना शाळेच्या प्रवेशव्दारातुन स्वागतासह आत घेण्यात आले. या वेळी संस्थेचे जेष्ठ संचालक परशुरामअण्णा गुरव व शिवाजीराव पाटील उपस्थित होते .
यावेळी विद्येची देवता सरस्वती फोटो पूजन करून स्वागत गीता सह विद्यार्थ्यांना आत घेण्यात आले.
,प्रास्ताविक व उपस्थितांचे स्वागत मुख्याध्यापक के.व्ही.कुलकर्णी यानी केले.
कार्यक्रमाचे अवचित साधुन विद्यार्थ्यांना सरकारमार्फत देण्यात येणारे पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले.
यावेळी पाहुण्यानी विद्यार्थ्याना मार्गदर्शन केले.
विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली.

