संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
छत्रपती शाहू प्रकाशन मंडळ, बेळगाव व राज्य मराठी विकास मंडळ मुंबई यांच्यातर्फे गर्लगुंजी गावची सुकन्या मराठी विद्यानिकेतनची विद्यार्थीनी कु. प्रतिज्ञा विनोद कुंभार हिने दहावी परीक्षेत मराठी विषयात १२५ पैकी १२४ गुण घेतल्याबद्दल तिचा सन्मानपत्र, स्मृति चिन्ह व प्रेरणापुस्तक देवून शनिवार (दि.२३) रोजी मराठी विद्यानिकेतन मध्ये सन्मानित करण्यात आले.
प्रतिज्ञा विनोद कुंभार ही पहिल्यापासूनच हुषार विद्यार्थीनी म्हणून ओळखली जाते. तिचे प्राथमिक शिक्षण गावातील सरकारी मराठी मुलींच्या शाळेत झाले. गर्लगुंजी ग्राम पंचायतीच्या माजी उपाध्यक्ष रेखा कुंभार व प्राथमिक कृषी पतीनचे संचालक, छायाचित्रकार विनोद कुंभार यांची ती सुकन्या होय. ज्येष्ट नाटककार यल्लाप्पा पालकर यांची नात तर दैनिक पुढारी चे पत्रकार, श्री संत गोरा कुंभार समाज विकास मंडळाचे सचिव परशराम पालकर यांची भाची होय. तिच्या या यशाबद्दल तिचे सगळीकडे कौतुक होत आहे.
