#येत्या चार दिवसात वीजपुरवठा सुरळीत झाला नाही तर आंदोलनाचा इशारा!
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
गर्लगुंजी ( ता.खानापूर ) परीसरात गेल्या दोन महिण्यापासुन सतत वीज पुरवठा खंडीत होत असल्याने नागरीकाना अनेक समस्याना तोंड द्यावे लागत आहे.नुकताच ग्राम देवता माऊली देवीची यात्रोत्सवात मुख्यदिवशी तब्बल सहा तास गावात वीज पुरवठा खंडीत झाल्याने अनेक समस्या निर्माण झाल्या.त्यानंतर दररोज वीज पुरवठा खंडीत होण्याचे प्रकार सुरूच आहेत.त्यामुळे नागरीक त्रस्त झाले आहेत.
तर ५ मे रोजी झालेल्या वादळी पावसामुळे तब्बल २६ तास वीज गायब झाली.
त्याचबरोबर १३ मे रोजी ही पावसामुळे १८ तास वीज पुरवठा खंडीत झाल्याने गावातील दैनंदिन व्यवहार ठप्प होऊन गावचा पाणी पुरवठा विस्कळीत झाला.दळप कांडप गिरण्या, तसेच लघू उद्योग ही बंद झाले.त्यामुळे नागरीकातुन नाराजी पसरली, त्यामुळे त्रस्त नागरीकानी खानापूर हेस्काॅम खात्याला जाब विचारत अधिकार्याना निवेदन सादर केले.
निवेदनात म्हटले आहे की, गर्लगुंजी परिसरात वीज पुरवठा सुरळीत करा.अन्यथा येत्या चार दिवसात हेस्काॅम कार्यालयावर मोर्चा काढुन आंदोलन छेडण्यात येईल. असा ईशारा गर्लगुंजी ग्रामस्थानी निवेदन देताना दिला.निवेदन देताना गर्लगुंजी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


