संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
करिकट्टी ( ता.खानापूर) येथील कक्केरी ग्राम पंचायत हद्दीतील गावात विठ्ठल रुक्मिणी मंदिरात उद्यान सोमवारी दि.११ व मंगळवारी दि.१२ रोजी विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहेत.
सोमवारी सकाळी ११ वाजता विठ्ठल रुक्मिणी मुर्तीपुजन , वीणा टाळ मृदंग पूजन, पंचपदी भजन, ज्ञानेश्वर वाचन ,हरिपाठ , प्रवचन ,व महाप्रसाद आदी कार्यक्रम होणार असुन ,रात्री ८ वाजता भजन व प्रसिध्द किर्तनकार चंद्रकांत तांबिटकर याचे कीर्तन होणार आहे.
मंगळवारी दि.१२ रोजी सकाळी मुर्ती पुजा ,पंचपदी भजन , ज्ञानेश्वरी वाचन , किर्तन , दिंडी, हरिपाठ,किर्तन व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
याकार्यक्रमाला महाराष्ट्रातील बालगेरी महाराज उपस्थित राहणार असुन, प्रमुख पाहूणे म्हणून खासदार विश्वश्वेर हेगडे कागेरी,पालक मंत्री सतीश जारकिहोळी, आमदार विठ्ठल हलगेकर, निजद नेते नासिर बागवान आदी उपस्थित राहणार आहेत.