संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर शहरातील मराठा मंडळ शिक्षण संस्थेच्या ताराराणी हायस्कूलचा सन २०२५ -२६ सालातील एप्रिल महिण्यात घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल ९८.५१ टक्के लागला असुन हायस्कूलमधुन निकिता चौरी हिने ९७.६० टक्के गुण घेऊन प्रथम येण्याचा मान मिळविला आहे. तर जान्हवी पाटील व सोनाली दळवी दोघीनी ९७.४४ टक्के गुण घेऊन व्दितीय क्रमांक पटकाविला.तसेच श्रृतिका गोरे हिने ९५.५२ टक्कर गुण घेऊन तृतीय क्रमांक पटकाविला.
यंदाच्या दहावीच्या परीक्षेत एकूण २०२ विद्यार्थीनी बसल्या होत्या.त्यापैकी १९९ विद्यार्थीनी उतीर्ण झाल्या.यामध्ये विशेष श्रेणीत ४२ विद्यार्थी नी, प्रथम श्रेणीत ११२ विद्यार्थीनी, व्दितीय श्रेणीत २६ विद्यार्थी नी तर तृतीय श्रेणीत १९ विद्यार्थीनी पास झाल्या आहेत.
यशस्वी विद्यार्थीनीचे मराठा मंडळ संस्थेच्या अध्यक्षा डाॅ.राजश्री नागराजू,तसेच संचालक शिवाजी पाटील,परशराम गुरव,आदीनी अभिनंदन केले.
तर मुख्याध्यापक राहुल जाधव, इतर शिक्षकाचे मार्गदर्शन मिळत आहे.
यशस्वी विद्यार्थीनीचे खानापूर तालुक्यातून अभिनंदन होत आहे.

