#समाज विज्ञान विषयाचा दोन्ही माध्यमचा १०० % निकाल!
संदेश क्रांति न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
खानापूर शहरातील मराठा मंडळ संस्थेच्या मराठा मंडळ हाय्यर सेकंडरी स्कूल चा दहावीचा निकाल ९६ टक्के लागला असुन
दहावी परीक्षेला एकूण १९८ मुले बसली होती,त्यापैकी , १९० मुले पास झाली.असुन एकूण डिस्टिंक्शनमध्ये १८ मुले फर्स्ट क्लास ९० मुले पास झाली तर सेकंट क्लासमध्ये ५४ मुले पास झाली.तसेच पास क्लास मध्ये २९ मुले उतीर्ण झाली आहेत.
हायस्कूलमधुन चैतन्य मष्णू गोरल याने ९५.३६ टक्के गुण घेऊन प्रथम क्रमांक पटकाविला.तर महेश मोहन पाटील याने ९५.२० टक्कर गुण घेऊन व्दितीय क्रमांक पटकाविला.स्वप्निल नारायण किणयेकर याने ९३.७६ टक्के गुण घेऊन तृतीय क्रमांक पटकाविला, चौथा क्रमांक विजय सहदेव दळवी याने ९३.६० टक्के गुण घेऊन पटकाविला.पाचवा क्रमांक युवराज विक्रम साबळे याने ९२. ८० टक्के गुण घेऊन यश संपादन केले आहे.
# प्रतिक्रिया: मुख्याध्यापक के.व्ही.कुलकर्णी
यशस्वी विद्यार्थ्याना सुरूवातीपासुन जादा क्लास, विशेष मार्गदर्शन , सराव परीक्षे
साठी मुख्याध्यापकासह सहशिक्षकानी परीश्रम घेतले. प्रत्येक विद्यार्थ्यामागे लक्ष देऊन त्याना मार्गदर्शन केले.त्यामुळे मराठी व कन्नड माध्यम मधील समाज विज्ञान विषयात १०० टक्के निकाल लागला.त्यामुळे विद्यार्थ्यासह शिक्षकाचे अभिनंदन होत आहे.
यशस्वि विद्यार्थ्याचे संस्थेचे अध्यक्ष डॉ. राजश्रीताई नागराज व संचालक परशुराम अण्णा गुरव , शिवाजीराव पाटील यानी अभिनंदन केले.तर हायस्कूलचे मुख्याध्यापक के.व्ही. कुलकर्णी इतर शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले आहे.

