संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर तालुक्यातील बैलूर ग्राम पंचायतीच्या हद्दीतील कौलापूरवाडा येथील क्वालिटी पोल्ट्री कंपनीचा हॅचरी प्रकल्प लवकरात लवकर बंद करा. आशा मागणीचे निवेदन क्राॅग्रेस नेते सामाजिक कार्यकर्ते भैरू पाटील यांच्या नेतृत्वाखाली महसुल मंत्री कृष्ण भैरेगावडा याना दिले.
निवेदनात म्हटले आहे,की कौलापूरवाडा येथे क्वालिटी पोल्ट्री कंपनीचा हॅचरी प्रकल्प सुरू करून गावकर्याच्या जीवाशी खेळ होत आहे. स्थानिक अधिकार्याच्या मदतीने गावकर्याच्यावर जबरदस्तीने प्रकल्पाची सुरूवात करण्यात येत आहे. तेव्हा गावकर्यानी लोकशाही मार्गाने विरोध करत असताना स्थानिक अधिकारी याकडे दुर्लक्ष करत आहेत.
त्यातच ग्राम पंचायतीचा ठराव न घेताच, प्रर्दुषण मंडळाची परवानगी न घेताच व जिल्हा आरोग्य खात्याची ही परवानगी न घेताच बेकायदेशीर हा प्रकल्प सुरू केल्याने ग्रामस्थावर अन्याय केला आहे.
तेव्हा प्रथम या प्रकल्पाची चौकशी व्हावी .व लागलीच हा प्रकल्प बंद करण्यासाठी जिल्हाधिकार्याना आदेश द्यावा.अशा मागणीचे निवेदन महसुल मंत्री कृष्णभैरेगावडा याना देण्यात आला.
यावेळी क्राॅग्रेस नेते सामाजिक कार्यकर्ते भैरू पाटील,काॅग्रेस ब्लाॅक अध्यक्ष अँड ईश्वर घाडी, काॅग्रेस नेते विनायक मुतगेकर,सुरेश जाधव,ग्रामस्थ गंगाराम बावदाने,बाबू बावदाने, व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.