
माजी विद्यार्थी संघटना व हायस्कूलच्यावतीने !
प्रमुख वक्ते : प्रा.शिवाजीराव भुकेले(डाॅ.घाळी काँलेज गडहिंग्लज)
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर (सुहास पाटील )
मराठा मंडळ संस्थेच्या कापोली (ता.खानापूर ) येथील मराठा मंडळ हायस्कूलचे विज्ञान शिक्षक संजीव गणेश वाटूपकर हे गेल्या ३२ वर्षाच्या शिक्षकी सेवेतुन येत्या ३० सप्टेंबर रोजी सेवानिवृत होत आहेत.
कापोली हायस्कूलमध्ये सदिच्छा समारंभ!
उद्या रविवार दि .१५ सप्टेबर रोजी सकाळी १०.३० वाजता हायस्कूलच्या सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.
सदिच्छा समारंभाच्या अध्यक्षस्थानी संभाजी देसाई जेष्ठ नेते म ए.समिती उपस्थित राहणार आहेत.तर विशेष उपस्थिती आमदार विठ्ठलराव हलगेकर,माजी आमदार अरविंद पाटील, व बाबूराव एन पाटील
तसेच प्रमुख पाहुणे म्हणून निवृत्त प्राचार्य आर जी देसाई, पीटर डिसोझा ,प्रा.भरत तोपिनकट्टी , ग्राम पंचायत अध्यक्षा सौ नम्रता देसाई उपस्थित राहणार आहेत.
यावेळी सत्कारमुर्ती संजीव वाटूपकर याचा सपत्नीक सत्कार होणार आहे.
यावेळी प्रमुख वक्ते म्हणून प्रा.शिवाजीराव भुकेले (डाॅ.घाळी काॅलेज गडहिंग्लज) हे उपस्थित राहणार आहेत.
तरी यासोहळ्याला सर्वानी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी .असे आवाहन आयोजकाच्यावतीने करण्यात आले आहे.