
गेली ४९ वर्षे एक गाव एक गणपती होतोय साजरा.
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर ( सुहास पाटील)
इदलहोंड ( ता.खानापूर ) येथे एक गाव एक गणपती परंपरा गेली ४९ वर्षे कायम चालु आहे. एक गाव एक गणपती ही संकल्पना जोपासुन इदलहोंड गावाने एक आदर्श समाजापुढे ठेवला.
सन १९७५ साली इदलहोंड गावात बॅ.नाथ पै युवक मंडळाची स्थापना होऊन गावातील ग्रामदेवता श्रीपिसेदेव मंदिरात एक गाव एक गणपतीची सुरूवात झाली.गेली ४९ वर्षे ही परंपरा अंखड चालु आहे.
इदलहोंड गाव हे ५हजार हुन अधिक लोकवस्तीचे गाव असुन सामाजिक ,शैक्षणिक, राजकीय क्षेत्रात तसेच सहकार क्षेत्रात अग्रेसर गावात विविध जाती धर्माचे लोक असुन मोठ्या गुण्यागोविंदाने हा सार्वजनिक गणेशोत्स “एक गाव एक गणपती ” साजरा करतात.
गणेशोत्सव साजरा करताना अबालपासुन वृध्दापर्यत सारेजन सहभागी होतात.
गेल्या अकरा दिवसात गणेशोत्सव विविध कार्यक्रमाचे आयोजन करून सर्वाना आनंद देतात.
गणेशोत्सवात विविध कार्यक्रमाचे आयोजन!
गणेशोत्सव काळात महिलासाठी रांगोळी स्पर्धा तसेच संगीत खुर्ची, भाषण स्पर्धा त्याच बरोबर महाप्रसादाचे आयोजन तसेच लोकोपयोगी विविध कार्यक्रम गेल्या ११ दिवसात राबविण्यात आले.
इदलहोंड गावात “एक गाव एक गणपती ” हा गणेशोत्सव सन नेहमी गावकर्याच्या उत्स्पूर्त देणगीतुन साजरा केला जातो.
अनावश्यक खर्चाला फाटा देत इदलहोड गावात सर्वाच्या सहकार्यातुन हा सन साजरा केला जातो.
# इदलहोंड गावचा सार्वजनिक गणेशोत्सव पार पाडण्यासाठी!
इदलहोंड (ता.खानापूर) गावचा” एक गाव एक गणपती ” उत्सव पार पाडण्यासाठी गणेश मंडळाचे अध्यक्ष नामदेव पाखरे,उपाध्यक्ष राजेद्र चोपडे,सेक्रेटरी विशाल पाटील, उपसेक्रेटरी संतोष चोपडे,खजिनदार संजय जाधव,तसेच सहा्य्यक बी एम पाखरे,डी पी जाधव ,बी एल जाधव,गोविंद जाधव,त्याचबरोबर समर्थ जाधव,प्रविण जाधव,एस.एच पाटील,यशवंत पाटील,मल्लू जाधव,संजय जाधव,राहुल पाटील,बलराम चोपडे व गावकर्याचे मोठ सहकार्य व प्रयत्न लाभत आहेत.