
#खानापूर तालुका काॅग्रेस अध्यक्ष अँड ईश्वर घाडी याची मागणी!
संदेश क्रांती न्यूज
खानापूर ( सुहास पाटील )
बेळगांव पणजी राष्ट्रीय महामार्गावरील खानापूर तालुक्यातील होनकल ते लोंढा पर्यतच्या गावांचे नाम फलक व दिशादर्शक फलक नसल्याने याभागातील कोणते गाव कोणत्या ठिकाणी आहे.कोणती वळणे आहेत.हे वाहनधारकांच्या लक्षात येत नाही.
तेव्हा प्राधिकरणाच्या वतीने लवकरात लवकर होणकल क्राॅस ते लोंढा पर्यतच्या गावांचे नामफलक व दिशादर्शक फलक बसवावे.अशी मागणी खानापूर तालुका काॅग्रेस अध्यक्ष अँड.ईश्वर घाडी यानी केली आहे.
यावेळी ते म्हणाले की,होणकल क्राॅस पासुन गंगवाळी ,शिंदोळी ,नायकोल ,माणिकवाडीतिवोली ,वाडा,सावरगाळी ,गुंजी ते लोंढा पर्यतची अनेक गावे या महामार्गाला जोडलेली आहेत. परंतु या गावच्या क्राॅसवर एक फलक नाही .त्यामुळे बसचालकाना बस थांबा कुठे आहे याचा पत्ता लागत नाही.बसेस सुसाट वेगाने धावतात.त्याचबरोबर वाहनधारकाना कोणते गाव कुठे आहे.हे समजत नाही.
या महामार्गावरील केवळ खानापूर ते बेळगाव पर्यतच नामफलक बसवले आहेत.
एवढेच नव्हेतर गणेबैल जवळ टोलनाका सुरू केेला आहे.मात्र सुविधा अपूर्या आहेत.
तेव्हा खानापूर होनकल पासुन ते लोंढापर्यत नामफलक बसविले नाहीत.त्यातच महामार्गाचे काम ही धीम्या गतीने सुरू आहे.
जोड रस्त्याची कामे ,रस्त्याच्या दुतर्फा साईड पट्ट्यांची कामे लवकर करून महामार्गावर गावचे नाम फलक बसवावे.अन्यथा रास्तो रोको करून आंदोलन छेडू असा ईशारा ही त्यानी दिला.