
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर ( सुहास पाटील )
हलकर्णी ( ता.खानापूर ) ग्राम पंचायत हद्दीतील हत्तरगुंजी गावाजवळील शाहु अगणोजी फार्म परिसरात आर एस क्रमांक ६६ मध्ये नरेगा योजनेंतर्गत तलावातील गाळ काढण्याच्या कामाला सुरूवात करण्यात आले. असुन कामाच्या ठिकाणी मजुराना प्रथमोपचार बाॅक्स ,पाण्याची बाटली, टोप्या व इतर साहित्याचे वाटप नुकताच करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुका पंचायतीचे प्रभारी कार्यनिर्वाहक अधिकारी रमेश मेत्री होते.
त्यांच्याच हस्ते मजुरांना विविध साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी हलकर्णी, हत्तरगुंजी, डुक्करवाडी,मुडेवाडी आदी गावच्या पाच संघाच्या १८५ मजुरांचा सहभाग होता.
यावेळी ग्राम विकास अधिकारी,सेक्रेटरी,ग्राम पंचायत अध्यक्ष,उपाध्यक्ष व सर्व सदस्य तसेच तालुका पंचायतीचे संगणक आँपरेटर व कर्मचारी उपस्थित होते.