
#२०वे गुंफण सदभावना साहित्य संमेलन!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
मातृभाषेवर अन्याय होत आहे.तो केवळ मराठी भाषेवर नसुन कन्नड भाषेवर ही अन्याय होत आहे.याचे कारण म्हणजे इंग्रजीचे पालकातुन वाढलेले फॅड होय, आपली मुल काही तर वेगळ वाचतात वेगळ बोलतात याच कौतुक पालकाना आहे. त्यामुळे आजची पिढी मातृभाषेपासुन दुरावत असुन इंग्रजी शिक्षण घेत समाजापासुन दुर जात आहेत.त्यामुळे या पिढीचे भविष्य बरबाद होत आहे.
असे विचार अभिजीत भाषा समितीचे अध्यक्ष रंगनाथ पठारे यानी व्यक्त केले.
खानापूरात २० वे गुंफण साहित्य अकादमी व शिव स्वराज जन कल्याण फाऊंडेशन याच्या संयुक्त विद्यामाने सदभावना साहित्य समेलनात अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
प्रारंभी ग्रंथदिडीने कार्यक्रमाची सुरूवात झाली.
संमेलनस्थळाला दिवंगत उदयसिंग सरदेसाई नगरी,तर विचारपिठाचे जेष्ठ साहित्यिक मनोहर माळगांवकर व्यासपीठ असे नामकरण करण्यात आले.
यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की भाषेला मोठी परंपरा आहे.असे सांगुन मातृभाषा टिकायची असेल आज मातृभाषेवर किमान स्वार्थ म्हणून प्रेम केले पाहिजे तरच मातृभाषा टिकेल.असे ते म्हणाले.
ग्रंथदिडीचे उदघाटन!
सकाळी श्री ज्ञानेश्वर मंदिर येथे ग्रंथदिंडीचे उदघाटन माजी आमदार मनोहर किणेकर,माजी आमदार दिगंबर पाटील,श्रीराम सेना अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर ,मध्यवर्ती म ए समितीचे सरचिटणीस मालोजी अष्टेकर आदीच्याहस्ते करण्यात आले .
ग्रंथदिंडी श्री ज्ञानेश्वर मंदिरापासुन वारकर्याच्या टाळ मृदंगाच्या नादात, सुरू झाली.यावेळी महिलानी डोकीवर कलश घेऊन दिंडीत सहभागी झाले होते.
दिडींत स्वागताध्यक्ष निरंजन सरदेसाई,समेलनाध्यक्ष रंगनाथ पठारे, समिती अध्यक्ष गोपाळ देसाई, माजी अध्यक्ष विलास बेळगांवकर,गोपाळ पाटील,बाबूराव पाटील माचीगड,संभाजी देसाई, भैरू पाटील, जयराम देसाई व इतर मान्यवर सहभागी झाले. होते.
यावेळी कै.श्रीमंत उदयसिंह सरदेसाई साहित्य नागरी उद्घाटन मध्यवर्ती म ए समितीचे सरचिटणीस मालोजी अष्टेकर व खानापूर म ए समितीचे माजी अध्यक्ष विलास बेळगावकर याच्याहस्ते करण्यात आले.
त्यानंतर संमेलनाचे उदघाटन अध्यक्ष व दिपप्रज्वलन रंगनाथ पठारे ,स्वागताध्यक्ष निरंजन सरदेसाई,विलास बेळगावकर,साहित्यिका चित्रा क्षिरसागर,डाँ.बसवेश्वर चेणगे ,बबन पोतदार ,गजानन चेणगे,गुणवंत पाटील, गोपाळ पाटील,भैरू पाटील आदीच्या उपस्थित पार पडला.
यावेली स्वागताध्यक्ष निरंजन सरदेसाई यानी स्वागत केले.
यावेळी मान्यवराचा सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संजीव वाटूपकर यानी केले.