
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर (सुहास पाटील)
गोवा येथे पार पडलेल्या राष्ट्रीय पुरस्कार प्रदान सोहळ्यात तोपिनकट्टी (ता.खानापूर) गावचे सुपूत्र व पारवाड मराठी शाळेचे शिक्षक नागेश मुरगोड यांना राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
गोवा येथील सांकळी रविंद्र भवन येथे रविवारी दि २७ रोजी आयोजित कार्यक्रमात कर्नाटक ,गोवा,महाराष्ट्र,दिल्ली, व गुजरात पाच राज्यातील विविध गुणवंताचा गौरव करण्यात आला.
पारवाड ( ता.खानापूर ) येथील मराठी उच्च प्राथमिक शाळेत नागेश मुरगोड हे शिक्षकीसेवा प्रामाणिकपणे सेवा बजावत आहेत. ते पदवीधर शिक्षक आहेत.
या पुरस्कार सोहळ्यात नागेश मुरगोड याना फेटा बांधुन तसेच मानचिन्ह,प्रमानपत्र उपस्थित मान्यवराच्याहस्ते देऊन गौरविण्यात आले.
सोहळ्याला निवृत्त मुख्याध्यापक ए.बी.मुरगोड,दशरथ कुंभार, गोपाळ पाटील, सौ जे.ए.मुरगोड, व इतर मान्यवर उपस्थित होते.