# तीन तास रास्ता रोको.!
संदेेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
गेल्या कित्येक वर्षापासुन बेळगाव गर्लगुंजीहुन बससेवा असायची .मात्र बससेवत बदल करून गर्लगुंजी बेळगाव बससेवा नंदीहळीमार्गे जात असल्याने गर्लगुंजी ते राजहंसगड गावापर्यतचे तीन बसस्थानकावरील विद्यार्थी ,नागरीक तसेच प्रवाशाची गैर सोय होत आहेत.
म्हणून गर्लगुंजी ग्राम पंचायत नागरीक,व विद्यार्थ्याच्या अथक प्रयत्नाने
बेळगाव गर्लगुंजी अशी बससेवा सुरू करण्यात आली . परंतू बेळगाव गर्लगु़जी खानापूर मार्गाची माहिती मसलेले खासदार जगदिश शट्टर यानी संबधीत केएसआरटीसी खात्याला दिलेल्या पत्रामुळे ती बस बेळगाव नंदीहळळी मार्गे जात होती.तर दुसरी बस आमदार विठ्ठलराव हलगेकर यानी दिलेल्या पत्रामुळे तोपिनकट्टी गावापर्यत जात होती. त्यामुळे बसच्या वेळापत्रकात फरक पडल्याने गर्लगुंजी गावच्या विद्यार्थ्याचे ,नागरीकांचे तसेच प्रवासांची गैरसोय होत होती.
गर्लगुंजी परिसरातील विद्यार्थ्याना शाळा काॅलेजला जाण्यासाठी तसेच कामगाराना जाण्यासाठी वेळेची गैरसोय होत होती.
याच कारणासाठी गर्लगुंजी ग्राम पंचायतीने अनेकवेळा संबधीत बेळगाव डेपो मॅनेजर विनंती ,अर्ज ही केले आहेत. परंतु काहीच मार्ग निघाला नाही. शेवटी आज मंगळवारी दि .१५ रोजी गर्लगुंजी बसस्थानकावर रास्ता रोको आंदोलनाला प्रारंभ केला .
सतत तीन तास रास्ता रोको करून वाहतुक ठप्प करण्यात आली.
या घटनेची माहिती खानापूर आगाराचे सहाय्यक डेपो मॅनेजर विठ्ठल कांबळे घटनास्थळी धाव घेऊण परिस्थितीची माहिती करून घेतली व सर्व अटी मान्य केल्या.
लागलीच खानापूर पोलिस स्थानकाचे पी आय.लालसाब गंवडी यानी संपर्क साधून घटना स्थळी पोलिसाना पाठविले.
मात्र मागण्या मान्य झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही.अशी भुमीका नागरीकानी घेतली . व गर्लगुंजी गावासाठी असलेल्या बसेस गावामर्यादीत असाव्यात अशी मागणी यावेळी करण्यात आली.
आंदोलनच्या वेळी गर्लगुंजी ग्राम पंचायतीचे माजी अध्यक्ष गोपाळ पाटील ,माजी तालुका पंचायत सदस्य पांडुरंग सावंत,ग्राम पंचायत सदस्य अजित पाटील,हणमंत मेलगे, प्रसाद पाटील ,सुरेश मेलगे, नागरीक बाबूराव मेलगे,मर्याप्पा पाखरे , विनोद कुंभार,सोमनाथ यरमाळकर,शांताराम मेलगे,गोकुळ चौगुले, सुनिल पाटील ,मारूती पाटील,लक्ष्मण मेलगे, चन्नाप्पा मेलगे,नारायण कोलेकर,पुंडलिक पाटील,चन्नाप्पा बुरूड,कल्लापा लोहार,मारूती कोलकार, विद्यार्थी नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.