
खानापूर प्रतिनिधी
डोंगरगांव (ता.खानापूर ) गावचा सुपूत्र सध्या राहणार पणजी अविनाश विनोद देसाई यांचे वयाच्या अकराव्या वर्षी शनिवारी दि.२६ रोजी कर्करोगांने दुःखद निधन झाले.
त्याच्या पश्चात आई ,वडील असा परिवार आहे
त्यांचा अंत्यविधी डोंगरगांव येथे पार पडला. यावेळी खानापूर तालुक्याचे माजी आमदार अरविंद चंद्रकांत पाटील, म. ए. समितीचे अध्यक्ष गोपाळराव देसाई, मध्यवर्ती म ए समितीचे सदस्य गोपाळराव पाटील व पांडुरंग सावंत, तसेच गोवा आणि डोंगरगाव भागातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते. कुमार अवनीश हे खानापूर तालुका म ए समितीचे सरचिटणीस आबासाहेब दळवी यांचे नातू होते. कुमार अवनीश अतिशय विनम्र आणि मनमिळावू स्वभावाचे होते, त्यांच्या जाण्याने हळहळ व्यक्त होत आहे.