
#पहिले बक्षिस १ लाख रू.!दुसरे बक्षिस ५० हजार रू!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर ( सुहास पाटील )
खानापूर शहरातील निंगापूर गल्लीच्या श्री चव्हाटा युवक मंडळ यांच्यावतीने आयोजित आमदार चषक क्रिकेट स्पर्धा दि.७ फेब्रुवारी ते दि.१६ फेब्रुवारी पर्यत खानापूर शहहराच्या जांबोटी क्राॅसजवळील मलप्रभा क्रिडांगणावर आमदार विठ्ठलराव हलगेकर व माजी आमदार डीसीसी बॅक संचालक अरविंद पाटील यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आली आहे.
अशी माहिती भाजप युवा मोर्चा ग्रामीण सेक्रेटरी पंडित ओगले यांच्या नेतृत्वाखाली निंगापूर गल्ली चव्हाटा युवक मंडळाच्यावतीने आयोजीत पत्रकार परिषदेत बोलताना पंडित ओगले यांनी माहिती दिली.
यावेळी बोलताना पंडित ओगले म्हणाले की,आमदार चषक क्रिकेट स्पर्धेसाठी पहिले बक्षिस १ लाख रूपये ,तर दुसरे बक्षिस ५० हजार रूपये असुन इतर लहान आकर्षक बक्षिसे देण्यात येणार असल्याचे त्यानी सांगीतले.
तसेच उत्कृष्ट गोलंदाज, आणि उत्कृष्ट फलंदाज याना टीव्ही देण्यात येणार आहे.त्याच बरोबर मॅन आँफ दि मँच साठी फ्रिज बक्षिस म्हणून देण्यात येणार आहे.
तर प्रत्येक मॅच मधील मॅन आँफ दी मॅचसाठी ट्राॅफी देण्यात येणार असल्याचे त्यानी सांगीतले. या क्रिकेट स्पर्धेसाठी प्रेवश फी ५ हजार रूपये ठेवण्यात आले असुन प्रवेशासाठी शेवटची तारीख ३१ जानेवारी आहे.
यावेळी पत्रकार परिषदेला भाजप युवा मोर्चा ग्रामिण सेक्रेटरी पंडित ओगले,तसेच चव्हाट युवक मंडळाचे विनायक चव्हाण,सुहस गुळेकर,सोमनाथ गावडे,रजत सडेकर, मानसिंग चौगुले,व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.