
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
बिडी (ता.खानापूर ) येथील
जी.ई.सोसायटी संचलित नेहरू मेमोरियल संयुक्त पदवीपूर्व महाविद्यालयाचा द्वितीय पी.यू.सी. निकाल ८४% लागला असून, वाणिज्य विभागाचा विभागाचा निकाल १००% लागला आहे. विशेष म्हणजे वाणिज्य विभागाचा निकाल सलग सहा वर्षांपासून शंभर टक्के होत असून, चार विषयांचा निकालही शंभर टक्के लागला आहे.
दोन विध्यार्थी विशेष श्रेणीत तर एकोणीस विध्यार्थी प्रथम श्रेणीत नऊ विध्यार्थी द्वितीय श्रेणी तर उर्वरित विध्यार्थी पास श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. कु. गीता चुंगाडी ही ८७% गुण मिळवून काॅलेजमध्ये प्रथम आली आहे तर दिपा वाणी ही द्वितीय तर भारती दावतार ही काॅलेजमधून तृतीय आली आहे.
संस्थेचे अध्यक्ष महेश बिडीकर, कार्यदर्शी गणू कुलकर्णी, संचालक डॉ. जी.व्ही.जवळी व संचालक मंडळ, प्राचार्य एल.पी.पाटील आणि प्राध्यापक वर्गाचे मोलाचे मार्गदर्शन लाभले असून, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यी- विद्यार्थीनींनी मिळविलेल्या या घवघवीत यशाबद्दल परिसरातून सर्वांचे कौतुक होत आहे.