#आळंदी येथील कार्यक्रमात सत्कार!
संदेश क्रांती न्यूूज :
खानापूर (सुहास पाटील )
अखिल भारतीय प्रजापती कुंभाकार महासंघ आयोजित आळंदी देवाची येथे नुकताच घेण्यात आलेल्या कार्यक्रमात देशातील विविध राज्यातुन आलेले समाज बांधव – भगिनी, कुंभारकाम करणारे कारागीर आपली माती कला, जोपासत भारतीय संस्कृती पुनरजीवित करून समाजात रुजवत आहेत.त्यांचा सत्कार सोहळा सोमवार दि २६ रोजी आळंदी येथे पार पडला.
या सत्कार सोहळ्यात खानापूर विद्यानगरातील सौ. दीप एस सोनजी यांच्या मातीच्या अधुनिक शिल्पकलाचे कार्य पाहुन त्याना अखिल भारतीय प्रजापती कुंभकार महासंघ यांच्याकडुन देण्यात येणारा “प्रजापती भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
यावेळी सत्काराला उत्तर देताना सौ दीपा सोनजी म्हणाल्या की श्री.डहाळसकर साहेब यांचे कार्य समाज संघटन करून बेरोजगार तरुनांना मोलाचे मार्गदर्शन करत रोजगार निर्मिती उपलब्ध होत आहे. आज माझ्या कलेचा जो सन्मान झाला . त्यातून मला खुप ऊर्जा व प्रेरणा नक्कीच मिळणार आहे.असे मत व्यक्त केले.
#सौ.दीपा सोनजी या खानापूर सीव्हीपीआय येथे गेस्टे लेक्चरर म्हणून कार्यरत आहेत!
यावेळी दत्ता कुंभार(राष्ट्रीय अध्यक्ष मातीकला विकास सेल, आर.बी.के.प्रजापती(राष्ट्रीय संयोजक), सतीश कुंकळेकर(राष्ट्रीय अध्यक्ष), सी ए मनोज प्रजापती,बेहरूलाल प्रजापती (राष्ट्रीय कोषाध्यक्ष),नागनाथ कुंभार ( राष्ट्रीय उपाध्यक्ष), अँड.शशी कुमार, एस शिवानंदन ,डाॅ.के.के.वर्मा आदी उपस्थित होते.
वेळोवेळी मार्गदर्शन करनारे अखिल महाराष्ट्र कुंभार समाज विकास संस्था नाशिकचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.