
#१ कोटी रूपये निधीची तरदुत करा!
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
कालमनी (ता.खानापूर ) येथील उच्चप्राथमिक मराठी शाळाची स्थापना १९४५साली झाली आहे. तेव्हा शाळेच्या विकासासाठी सन २०१९ मध्ये माझी विद्यार्थी संघनेने श्री सिध्देश्वर फाउंडेशन संघटनेची स्थापना करून अनेक विकास कामे केली आहेत.
शाळेच्या पायाभूत सुविद्या, इतर विकास साधण्यासाठी लोक वर्गणीतुन देणग्या गोळा करून असुन जवळ पास १६ लाख रूपयापर्यतची रक्कम विकासासाठी खर्ची घातली आहे.
कालमणी मराठी शाळा डिजीटल स्कूल करण्यासाठी व सर्वागीण विकास करण्यासाठी १ कोटी रूपयाचा निधीची आवश्यकता आहे.
यासाठी कालमनी (ता .खानापूर ) येथील श्री सिध्देश्वर फाउंडेशन माजी विद्यार्थी संघटनेच्यावतीने बेळगाव जिल्ह्याचे पालक मंत्री सतीश जारकिहोळी याना निवेदन देऊन कालमनी मराठी शाळेला १ कोटीचा निधी मंजुर करावा . व राज्यातच चांगल्या प्रकारची डिजीटल शाळा व्हावी.अशा मागणीचे निवेदन श्री सिध्देश्वर फाउंडेशन संघटनेच्यावतीने देण्यात आले .
यावेळी बेळगांव जिल्ह्याचे पालक मंत्री सतीश जारकिहोळी यानी निवेदनाचा स्विकार करून निधी मंजुर करण्याचे आश्वासन दिले. व आपल्या पी.ए ना पाठवुन शाळेला भेट देण्याचे आश्वासन दिले.
निवेदन देताना कालमणी गावच्या श्री सिध्देश्वर फाउंडेशण संघटनेचे अध्यक्ष अनिल शांताराम कालमणकर,उपाध्यक्ष व्यंकटेश बसवंत नाईक,सेक्रेटरी सत्यदेव पांडुरंग नाईक ,खजिनदार तानाजी बाबली बळजी,सदस्य शिवाजी गोविंद सावंत ,मिलिंद श्रीपती नाईक, सिध्दाप्पा नामदेव भरणकर,हरिश बसवंत नाईक,कृष्णा पुंडलिक भरणकर,सिध्दापा मादार, शांताराम विठोबा नाईक, आदी पदाधिकारी तसेच पंचमंडळी आनंद रमेश मादार ,शिक्षक सुनील राजाराम मादार,सोमाजी भरणकर,मारूती चिगुळकर,राजाभाऊ मादार,व मार्गदर्शक विठोबा दळवी,श्रीपाद भरणकर,विलास नाईक ,किरण मादार आदी उपस्थित होते.