
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर ( सुहास पाटील )
खानापूर तालुक्याच्या जंगल भागातील शिवरात हातातोंडाशी आलेल्या भात पिकावर हत्तीकडुन चांगलीच संक्रात फिरली आहे.
गेल्या आठवड्यात तालुक्याच्या शिंदोळी बी.के. व शिवठाण व घोटगाळी भागात हत्तीच्या कळपाने शेतकर्याच्या हातातोंडाशी आलेल्या भात पिकाचे मोठ्याप्रमाणात नुकसान केले आहे.
या आदी मडवाळ भागात ९ हत्ती असलेल्या कळपाने भात पिकाचे मोठ्याप्रमाणात नुकासन केले आहे. तोच हत्तीचा कळप शिंदोळी बी के,शिंदोळी के.एच,शिवठाण भागातील शिवारातील भात पिकाचे नुकसान केले.काही शेतकर्याचे जवळ पास ४० पोती भात पिकाचा शिवार हत्तीने चिखलुन टाकला.त्यामुळेेे शेतकर्याला भाताचा एक दाण ही मिळणे कठीण झाला.एकच शेत तेही हत्तीने नुकसान करून टाकले. वर्षभर पोटाची खळगी कशी भरायची अशी विवेंचन शेतकर्याना पडली आहे. याकडे वनखात्याचे तसेच लोकप्रतिनिधीचे दुर्लक्ष होत आहे.
शिंदोळी ,शिवठाण बरोबर आता कापोली भागात हत्तीकडुन भातपिकाचे नुकसान!
शिवठाण,शिंदोळी ,घोटगाळी बरोबर आता कापोली भागातही काल हत्तीकडुन भात पिकांचे नुकसान झाले .कापोलीतील शेतकरी श्रीपती पांडुरंग देसाई,जगनाथ लक्ष्मण देसाई,सुभाष निंगनुरकर याशेतकर्याच्या उभ्या भातपिकाचे नुकासान केले.त्यामळे शेतकर्याचे लाखोचे नुकसान झाले आहे.
नुकसान ग्रस्त शेतकर्याना नुकसान भरपाई वेळेत द्या!
शिंदोळी,शिवठाण बरोबर कापोलीच्या शिवारात हत्तीकडुन भात पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.त्या शेतकर्याना वेळेत नुकसान भरपाई वनखात्याने द्यावी.अशी मागणी कापोली ग्राम पंचायतीचे माजी अध्यक्ष व विद्यामान सदस्य संदीप देसाई यानी केली आहे.