
#खानापूर पोलिसानी सात जणावर गुन्हा दाखल केला!
एकजन फरार!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
लक्केबैल ( ता खानापूर ) येथील पी के पी एस संघाचे सचीव प्रकाश पाटील याच्या आत्महत्या प्रकरणाने एक वेगळच वळण घेतले असुन पत्नी लक्ष्मी पाटील यांच्या तक्रारीवरून लक्केबैल सोसायटीच्या आजी माजी संंचालकासह लोकोळी गावातील तीघाजनासह सात जणावर गुन्हा नोंद झाला आहे.
यापैकी सहा जनाना अटक करण्यात आली असुन एकजन फरारी झाला आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की ,लक्केबैल पी के पी एस संघाचे सचीव प्रकाश पाटील यानी मंगळवारी दि.२९रोजी दुपारी संघाच्या कार्यालयात किटक नाशक प्राशन करून आत्महत्या केली. लागलीच त्याना खानापूर सरकारी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करून पुढील उपचारासाठी बेळगाव के एल ई हाॅस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले .मात्र उपचार दरम्यान त्याचा मृत्यू झाला .
सचिव प्रकाश पाटील याच्या आत्महत्ये मागे आजी माजी संचालक व गावातील काहीचा हात असल्याने व त्यांच्या धमकीमुळे तसेच आर्थिक व्यवहारामुळे त्यानी किटक नाशक प्राशन करून त्यानी आत्महत्या केल्याची तक्रार प्रकाश पाटलांच्या पत्नी लक्ष्मी पाटील यानी खानापूर पो़लिसात केली .
या प्रकरणी खानापूर पोलिस निरीक्षक मंजुनाथ नाईक,गुन्हे विभागाचे पी एस आय गिरीश एम यानी अधिक तपास करत आहेत.
पत्नी लक्ष्मी पाटील यानी तक्रारीत म्हटले आहेकी , माझ्या नवर्याकडुन सदरी व्यक्तीनी १० लाख रूपये घेतले होते. पण त्यानी ते परत करण्यास टाळाटाळ करत असल्याने त्याना माणसिक त्रास होऊन त्यानी आत्महत्या केली. त्याची सखोल चौकशी व्हावी.अशी मागणी केली. पत्नीच्या तक्रारी नुसार खानापूर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असुन सात जना पैकी सहा जनाना अटक करण्यात आली आहे.एकजन फरारी झाला आहे.
पोलिस गेल्या दोन दिवसापासुन या प्रकरणाची कसुन चौकशी करत आहेत.संघाच्या माजी अध्यक्ष आजी माजी संचालक तसेच लक्केबैल व लोकाळी गावच्या असे सात जनाचा यात समावेश आहे.
याप्रकरणी बुधवारी एफ आय आर दाखल झाल्यानंतर गुरूवारी दुपारी प्रकाश पाटील यांच्यावर लोकोळीत अंत्यसंस्कार करण्यात आले.