
शहर अध्यक्षपदी महांतेश राऊत!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर (सुहास पाटील )
खानापूर तालुका ब्लाॅक काॅग्रेस कमिटीच्या नतन पदाधिकार्याची निवड नुकताच करण्यात आली.
खानापूर तालुका ब्लाॅक काॅग्रेसच्या ग्रामीण अध्यक्षपदी अँड ईश्वर घाडी, तर शहर विभाग अध्यक्षपदी महांतेश राऊत, याची निवड करण्यात आली.
ग्रामीण महिला अध्यक्षपदी सावित्री मादार ,महिला शहर विभाग अध्यक्षपदी दीपा पाटील,ग्रामीण तालुका अल्पसंख्याक अध्यक्ष पदी तोईद चंदखन्नवर,शहर अल्पसंख्याक अध्यक्ष पदी मुबारक कित्तूर यांची नियुक्ती करण्यात आली.
माजी आम.डाॅ.अंजली निंबाळकर यांच्या शिफारसीवरून निवड!
वरील निवड ही अखिल भारतीय कमिटीच्या सचीव माजी आमदार डाॅ.अंजली निंबाळकर यांच्या शिफारसीवरून केपीसीसीचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री डी.के.शिवकुमार यानी नियुक्तीचा आदेश बजावला आहे.
यावेळी खानापूर तालुका पक्ष संघटा वाढविण्यासाठी नव्या पदाधिकार्यानी तसेच जेष्ठ व जुन्या कार्यकर्त्याच्या सहकार्याने कार्य करावे . अशी सुचना माजी आमदार डाॅ. अंजली निंबाळकर यांनी केली आहे.
यावेळी नविन ग्रामीण अध्यक्ष अँड ईश्वर घाडी यानी ही जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडण्याची ग्वाही दिली.