#हिंदुत्ववादी संघटनांच्या योगदानाचा विचार करून भाजप नेतृत्वाकडे करणार मागणी!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर तालुक्यातील सहा जिल्हा पंचायतीच्या आरक्षणात पाच जिल्हा पंचायत विभागात महिला आरक्षणासह गर्लगुंजी जिल्हा पंचायत विभागात सामान्य महिला आरक्षण आल्याने बजरंग दलाचे माजी तालुका अध्यक्ष नंदकुमार निट्टूरकर याच्या पत्नी गर्लगुंजी ग्राम पंचायतीच्या माजी अध्यक्षा सौ.अनुराधा नंदकुमार निट्टूरकर याना भाजपकडुन उमेदवारी द्यावी.अशी जोरदार मागणी खानापूर भाजपच्या मंडऴकडे करण्यात येत आहे.
आज पर्यत हिंदुत्ववादी संघटनानी भारतीय जनता पक्षासाठी दिलेले योगदान तसेच सातत्यपूर्ण सहकार्याचा विचार करून ही मागणी करण्यात आली आहे.
सौ.अनुराधा नंदकुमार निट्टूरकर या गर्लगुंजीच्या रहिवासी असून, घरचा एक प्रभावी राजकीय वारसा लाभलेलं व्यक्तिमत्व आहे.त्यांच्या मनमिळाऊ स्वभावामुळे त्या स्वतः गेल्या २०२१च्या ग्राम पंचायत निवडणुकीमध्ये भरघोस मतांनी निवडून येऊन ग्राम पंचायत अध्यक्षा म्हणून अत्यंत प्रभावी काम केले आहे.त्यांचे पती नंदकुमार निट्टूरकर यांनी सहा वर्षे खानापूर तालुका शिवसेना उपप्रमुख म्हणून आणि आठ वर्षे बजरंग दल तालुका प्रमुख म्हणून कार्य केले आहे,आजही ते धर्मस्थळ अभिवृद्धी संघाचे बेळगाव जिल्हा जनजागृती सदस्य म्हणून तसेच भारतीय जनता पार्टीचे सक्रिय कार्यकर्ते आहेत. सौ.अनुराधा निट्टुरकर यांचे सासरे मल्लू निट्टूरकर यांनी गर्लगुंजी कृषी पत्तीन सोसायटीवर चेअरमन म्हणून काम केले असून,ग्राम पंचायतचे ते माजी उपाध्यक्ष होते. गर्लगुंजी हे या जिल्हा पंचायत विभागात सर्वात मोठे गाव असून,याच गावच्या मतदानावर येथील उमेदवार आजपर्यंत निवडून आला आहे.त्याच बरोबर या जिल्हा पंचायत मधील सर्व गावामध्ये यांचा चांगला परिचय असून हा जिल्हा पंचायत विभाग जवळ जवळ ९५% ते ९८% हिंदू असलेला जिल्हा पंचायत विभाग असून गर्लगुंजी हे गाव १००% हिंदू मतदारांचे गाव आहे.यामुळे सर्व गोष्टींचा विचार करून एक प्रामाणिक काम केलेल्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्याचा विचार करून यावेळची उमेदवारी नंदकुमार निट्टूरकर यांच्या पत्नी सौ.अनुराधा नंदकुमार निट्टूरकर यांना मिळावी.अशी जोरदार मागणी सर्व हिंदुत्ववादी कार्यकर्ते करत आहेत.