#माजी आम.डी सी सी बैक संचालक अरविंद पाटील यांच्याहस्ते वितरण!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
बरगांव ( ता.खानापूर ) येथील विविधोद्देश प्राथमिक ग्रामिण कृषी सहकार संघ,( पी.के.पी.एस) च्या वतीने तीन टक्के व्याजदरात संघाचे सभासद विनायक पावनापा देसाई याना ट्रॅक्टरचे वितरण नुकताच करण्यात आले.
यावेळी माजी आमदार व डी सी सी बॅक संचालक अरविंद पाटील यांच्याहस्ते चाव्या देऊन वितरण केले.
प्रारंभी चेअरमन कल्लापा मुकूंद पाटील यानी प्रास्ताविक करून उपस्थितांचे स्वागत केले .
यावेळी कार्यक्रमाला सोसायटीचे व्हा.चेअरमन राजू कदम, संचालक विश्वास पाटील, महादेव कदम ,सय्यद धामणेकर,अरूण पाटील, नागेश सुतार, निंगो कांबळे, संचालिका सौ.सुनंदा पाटील, सौ.मलप्रभा पाटील, सौ.प्रियांका पाटील व सभासद उपस्थित होते .
आभार महादेव कदम यानी मानले.