#ही शर्यत मंगळवारी दि २७ आँक्टोबर ते गुरूवारी दि. २९ आँक्टोबर पर्यत!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर तालुक्यातील जय जवान जय किसान यांच्या सौजन्याने खास दसरा दिवाली सनानिमित्त मंगळवारी दि २७ आँक्टोबर ते गुरूवारी दि.२९ आँक्टोबर पर्यत एका बैलगाडीती चाके न बाधता बैलजोडीने बैलगाडी ओॆढण्याची जंगी शर्यतीचे आयोजित करण्यात आली आहे.
संस्थापक हाँ. सुभेदार मेजर हणंमंत गुरव
कर्नाटक राज्य राष्ट्रीय पुरस्कृत भारत गौरव अवार्ड सम्मानित यांच्या पुढाकाराने होणार्या शर्यतीच्या अध्यक्षस्थानी उपाध्यक्ष सदानंद होसुर राहणार आहेत.यावेळी आजी माजी आमदार विविध नेते मंडळी उपस्थित राहणार असुन ही शर्यत दोन गटात होणार आहे.
मोठ्या गटातील विजयी बैलजोडी मालकाना बक्षिसे अनुक्रमे पहिले बक्षिस HF100 Bike, दुसरे बक्षिस ४१,००१ रू, तिसरे बक्षिस ३१००१ रू, चौथे बक्षिस २१,००१ रू,पाचवे बक्षिस १६००१रू,अशी एकूण १६ बक्षिसे देण्यात येणार आहेत. तर प्रवेश फी ४००० रूपये असुन लहान गटातील विजयी बैल जोडी मालकाना बक्षिसे अनुक्रमे पहिले बक्षिस २१००१रू,दुसरे बक्षिस १८००१ रू, तिसरे बक्षिस १५००१रू,चौथे बक्षिस १२००१रू,पाचवे बक्षिस १०,००१ रू, अशी एकूण आठरा बक्षिसे देण्यात येणार आहेत.तर प्रवेश फी २००० रू आहे.
तरी हौशी बैलजोडी मालकानी याशर्यतीची लाभ घ्यावा.असे आवाहन जय जवान जय किसान याच्यावतीने कळविण्यात आले आहे.
