#आर. एफ. ओ. तेज वाय.पी. यांचा सत्कार!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर तालुक्यातील निलावडे येथील लिंगदेव मंदिरात निलावडे पंचायत क्षेत्रातील सर्व शेतकऱ्यांना वनखात्याच्या
वतीने मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी खानापूर आर एफ ओ तेज वाय पी तसेच त्यांचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.
प्रारंभी खानापूर भूलवाद सदस्य व मा जी ग्राम पंचायत उपाध्यक्ष विनायक मुतगेकर यानी स्वागत करून सभेचा उद्देश सांगीतला.
ते म्हणीले की शेतकऱ्यांच्या उस पिकाचे हत्तीकडून, गविरेडे ,रान डुक्कर तसेच अस्वल आदी प्राण्याकडुन नुकसान होत आहे.
एवढेच नव्हे तर या हिंस्त्र प्राण्याकडुन शेतकऱ्यांच्या जीवाला सुद्धा धोका आहे. शेतकरी पिकाची राखण करण्यासाठी रात्री, दिवसा शेताकडे जाणे सुद्धा कठीण होऊन बसले आहे.
तेव्हा आर. एफ.ओ तेज पी वाय यानी शेतकऱ्यांच्या शेतातील पिकात जनावरे येऊ नयेत याच्यासाठी सरकार दरबारी
उपाययोजनासाठी प्रयत्न करावा.अशी मागणी केली.
पीडीओ बळीराम देसाई यानी हत्तीकडून होणाऱ्या नुकसान भरपाई व शेतातील पाईपलाईनची, डनारळाच्या झाडांचे नुकसान याचा योग्य सर्वे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी. तसेच शेतीसाठी सोलार कंपनी व्यवस्था करावी व अशोकनगर, कांजळे, आंबोळी, बांदेकर वाडा गवळीवाडा मुघवडा आदी भागात, वनखात्याकडुन जंगलातून सहा बाय दहा असा मोठा कालवा मारून जेणेकरून हत्तींना शेतकऱ्यांच्या जमिनीत येण्यासाठी अडचण हवी.अशी व्यवस्था करावी व मुघवडे येथून दारोळी मलाप्रभा नदीपर्यंत मोठा कालवा काढावा व जंगली जनावरा पासून शेतकऱ्यांचा पिकाच संरक्षण करावे अशी मागणी केली.
यावेळी राजू धुरी यांनी सरकार दरबारी प्रयत्न करून वनखात्या मार्फत ज्या काही योजना आहेत त्या पुरवण्याचे काम करावे अशी मागणी केली.
यावेळी आर एफ ओ तेज पी वाय म्हणाले की ,सोलार साठी मीटर प्रमाणे किती तारा किती पोल व किती होल्टेज बॅटरी शेतकऱ्याने बसून सोलर सिस्टिम करून घेतले आहे त्याचे इस्टिमेट करून सोलार सबसिडी सुद्धा शेतकऱ्यांना मिळवून देण्यात येईल . तसेच सबसिडी ही दीड ते दोन लाखाच्या आसपास प्रत्येक शेतकऱ्याला मिळू शकते.असे सांगीतले.
यावेळी प्रगतशील शेतकरी व युवा कार्यकर्ते राजू सावंत, ओमनी नाईक पिके पी एस सदस्य , मुकुंद गावडे, रमेश नाईक ,पीकेपीएस सदस्य साताप्पा कवळेकर ,तुकाराम देसाई ,प्रगतशील शेतकरी हभप दिनकर देसाई, पी के सदस्य ह भ प पुंडलिक उचगावकर, महादेव कवळेकर ग्रामपंचायत सदस्य, तानाजी गावडे ,लक्ष्मण राणे ,लक्ष्मण धरी, अनंत बावकर, पांडुरंग देसाई, तसेच मुघवडा येथील पंचम मंडळी, गवळीवाडा येथील नाना गवळी व त्यांची सर्व नेते मंडळी आंबोळी येथील अर्जुन चोरलेकर संचालक नागेश देव सोसायटी बांदेकरोडा येथील अर्जुन चिखलकर प्रगतशील शेतकरी सागर देसाई ,मुकुंद गावडे, एकनाथ देसाई पिके पी एस मॅनेजर, नंदू चोर्लेकर, बांदेकर वाडा येथील ठाकर मामा निलावडे येथील प्रगतशील शेतकरी ज्योतिबा उचगावकर, मळव येथील शेतकरी मंडळी व सातेरी पार्सेकर माजी ग्रामपंचायत सदस्य तसेच आंबोळी येथील प्रकाश नाईक, नंदू चोर्लेकर, मुघवडे येथील प्रगतशील शेतकरी प्रकाश बेटगीरकर व ग्रामस्थ हजर होते.
कार्यक्रमाचे औचित्य साधुन
आर एफ ओ तेज वाय.पी.यांचा शाल व पुष्पहार घालुन सत्कार करण्यात आला.
आभार पीडीओ बळीराम देसाई यानी मानले.