#आजी,माजी लोकप्रतिनिधीनी लक्ष देण्याची गरज!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर तालुका शैक्षणिक दृष्ट्या मागासलेला तालुका म्हणून ओळख आहे.अशा तालुक्याला गेल्या दोन महिण्यापासुन बी ई ओ अधिकारी सेवानिवृत्त झाल्याने बी ई ओ अधिकारी पद रिक्त आहे.
#एकाच अधिकार्याला दोन पदाचा भार!
खानापूर तालुक्याचे बी ई ओ, पी. रामाप्पा हे जूलै महिण्यात सेवा निवृत्त झाले.आपल्या काळात त्यानी बी ई ओ म्हणून उत्तम बीईओ म्हणून सेवा बजावली, त्याच्या सेवानिवृत्त नंतर गेल्या दोन महिण्यापासुन बी ई ओ पद रिक्त असल्याने खानापूर गट समन्वय अधिकारी मंजुनाथ हत्ती यानाच बी ई ओ पदाचा प्रभारी बीईओ म्हणून कार्यभार सांभाळावा लागत आहे.
त्यामुळेच एकाच अधिकार्याला दोन अधिकारी पदाचा कार्यभार सांभाळताना तारेवरची कसरत होत आहे. त्यातच शैक्षणिक दृष्टया तालुक्याच्या शिक्षण दर्जाकडे दुर्लक्ष होत आहे.तेव्हा खानापूर तालुक्याला कायम स्वरूपी बीईओ अधिकारी मिळणे गरजेचे आहे.
तालुक्याच्या आजी,माजी आमदारानी नूतन बीईओसाठी प्रयत्न करणे गरजेचे!
खानापूर तालुक्याचे बी ई ओ अधिकारी सेवानिवृत्त होऊन दोन महिणे उलटून गेले.तरी अद्याप नुतन बीईओची नेमणूक झाली नाही.तालुक्यात सत्ताधारी काॅग्रेस पक्षाच्या माजी आमदार आहेत.तर भाजपचे खानापूर तालुक्याचे आमदार कार्यरत आहेत.
त्यामुळे नुतन बीईओ अधिकारी मिळविण्यासाठी प्रयत्न होणे अत्यंत गरजेचे आहे.त्यामुळे आजी,माजी आमदारांनी प्रयत्न करून लवकरात लवकर नूतन बीईओ अधिकार्याची नेमणूक करावी.अशी मागणी शिक्षण प्रेमीतुन होत आहे.
#बी.ई.ओ.अधिकार्यामुळे असतो शिक्षकावर वचक!
खानापूर तालुका हा अति जंगल मय तालुका आहे.जंगल भागातील शाळातुन शिक्षकांच्या कमतरतेमुळ शिक्षणाचा दर्जा घसरत आहे. खानापूर तालुक्यात केवळ अतिथी शिक्षकावर शाळा चालतात.अशा परिस्थितीत जर तालुक्याला कायम स्वरूपी बी ई ओ अधिकारी नसेल तर शिक्षकावर वचक राहणे कठीण आहे.
तेव्हा आमदारानी लवकरात लवकर बी ई ओ अधिकार्याच्या नेमणुकीसाठी प्रयत्न करने गरजेचे आहे.
खानापूर तालुक्याचे आमदार हे एक निवृत्त शिक्षकच!
खानापूर तालुक्याचे भाजपचे आमदार हे सुध्दा एक शिक्षक पेशातुन सेवा निवृत्त झाले आहेत.ते केवळ शिक्षकच नव्हे तर मुख्याध्यापक म्हणून सेवानिवृत्त झाले.
तेव्हा शाळा आणि शिक्षण हे काय असते.
त्यानी जवळून पाहिले आहे.त्याच्या अनुभववारून तालुक्याला लवकरात लवकर कायमस्वरूपी बी ई ओ मिळविणे गरजेचे आहे.