संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूरात गेल्या दोन ते तीन वर्षे खानापूरचे आरएफओ म्हणून प्रामाणिक सेवा बजावलेले सेवातत्पर आरएफओ श्रीकांत पाटील याची बदली झाली.
या त्यांच्या बदलीनिमित्त सत्कार सोहळा खानापूर येथील वनक्षेत्रपाल कार्यालयात नुकताच पार पडला.
खानापूरचे आरएफओ म्हणून वनप्राण्याकडुन झालेल्या नुकसान भरपाई प्रकरणे लवकरात लवकर निकालात काढण्याचे प्रयत्न करून आरएफओ श्रीकांत पाटील यानी उत्कृष्ट आरएफओ म्हणून खानापूर तालुक्यात नाव लौकिक मिळविला आहे.
आता त्याची बदली सामाजिक नवीकरण विभागाचे आरएफओ बदली झाली.त्या
निमित्त त्याचा सत्कार सोहळा पार पडला.
या सत्कार सोहळ्याला वनविभागाचे अधिकारी, तालुक्यातील विविध राजकीय पक्षाचे प्रमुख,शेतकरी वर्ग,उपस्थित राहुन आरएफओ श्रीकांत पाटील यांचा सत्कार सपत्नीक शाल,श्रीफळ,व भेट वस्तु देऊन
करण्यात आला.व त्याना प्रेमाचा निरोप दिला.
