संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
तोपिनकट्टी (ता. खानापूर )येथे परंपरेनुसार दर तीन वर्षांनी पाच दिवस कडक माऊली यात्रा करण्यात येते त्याप्रमाणे यावर्षी सुद्धा आज शुक्रवार दि.२१ रोजी सकाळी ११ वाजता सीमेचा गाऱ्हाणा घालून गावच्या सर्व सीमा बंद करण्यात येतील. त्यानंतर मंगळवार दि. २५ पर्यंत माऊली देवीची यात्रा चालू राहणार आहे. या पाच दिवसात कोणीही गावातून बाहेर जाऊ नये व बाहेरच्या पै पाहुण्यांनी कोणीही गावात येऊ नये आणि गावातील सर्व उपकरणे बंद असतील व
जत्रेच्या कालावधीत शांतता, स्वच्छता व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी सर्व ग्रामस्थांनी घ्यावी.
असे आवाहन जत्रा कमिटी, ग्रामस्थ तोपीनकट्टी यांच्या वतीने करण्यात आले आहे.