संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
सिंगीनकोप. (ता.खानापूर ) येथील पूर्व प्राथमिक मराठी शाळेत सोमवारी दि.१० रोजी सरकराच्यावतीने विद्यार्थ्याना आरोग्यासाठी देण्यात येणार्या जंत निवारण गोळ्यांचे वितरण व टी. टी. इंजेक्शन चा लाभ देण्यात आला.
यावेळी बेळगावहुन आलेल्या डाॅक्टर व गणेबैल प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी, तसेच आशा कार्यकर्त्या आदी उपस्थित होते.
यावेळी डाक्टर म्हणाले की, जंतू निवारण गोळ्याचे सेवन वर्षातुन एकदा तरी करावे.त्यामुळे तुमचे आरोग्य चांगले राहते.तसेच टी .टी. इंजेक्शन घेतल्याने कापले, जखम झाली तर धोका टऴतो. यासाठी प्रत्येकाने वर्षातुन एकदा तरी टी टी
इंजेक्शन घेणे गरजेचे आहे.,यासाठी सरकारने सरकारी शाळातुन मोफत जंतु निवारण गोळ्या , तसेच टी. टी.इंजेक्शनचे वितरण केले जाते.
यावेळी मुख्याध्यापक प्रकाश कुंभार, अतिथि शिक्षक नामदेव कुंभार विद्यार्थी उपस्थित होते.