पुल कोसळण्याची भिती, वहातुकीला धोका!
#लोकप्रतिनीधीनी पाहणी करण्याची माजी ग्रा.पं.सदस्य सागर पाटील यांची मागणी
खानापूर प्रतिनिधी
खानापूर तालुक्यातील जटगे हलसाल रस्त्यावरील पुलावर मोठे भगदाड पडुन पूल कोसळण्याची भिती जटगे माजी ग्राम पंचायत सदस्य सागर पाटील यानी केली आहे.
मंगळवारी दि. ११ रोजी माजी ग्राम पंचायत सदस्य सागर पाटील यानी जटगे हलसाल रस्त्यावरील पुलावर मोठे भगदाड पडल्याचे पाहिले, लागलीच वाहनधारकाना याचा धोका हो ऊन म्हणून भगदाडात झाडाची फांदी उभारून वाहन धारकाना सुचना केली आहे.
याच रस्त्यावरून शाळकरी मुले दररोज येजा करतात, शिवाय हाच रस्ता या
भागातील नागरीकाचा महत्वाचा रास्ता आहे.जर पुल ढासळले तर या रस्त्यावरील वाहतुक कायंमची बंद होण्याची भिती याभागातील नागरीकाना भेडसावित आहे.
तेव्हा खानापूर तालुक्याच्या आमदारानी त्वरित जटगे हलसाल रस्त्यावरील पुलावर पडलेल्या भगदाडाची प्रत्यक्ष पाहणी करून करून संबधीत खात्याच्या अधिकार्याना त्वरीत सुचना करून पुलाची दुरूस्ती करावी.अशी मागणी जटगे माजी ग्राम पंचायत सदस्य व गावच्या नागरीकानी केली आहे.