#आईवडीलांच्या डोळ्यातुन आनंदाश्रू!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
गर्लगुंजी (ता. खानापूर ) देसाई गल्लीतील युवक रविराज श्रीदत्त पाटील हा ईएमई सेंटर भोपाल येथे भारतीय ३ ईएमई (टेक्निकल सेंटर) सैन्य दस्त ट्रेनिंग पुर्ण करून सोमवारी दि.१० रोजी गर्लगुंजी आपल्या गावी येताच त्याचा भव्य स्वागत समारंभात पार पडला.
गर्लगुंजी येथील देसाई गल्ली त्याच्या स्वागतासाठी सुसज्जित तयारी करण्यात आली होती.
यावेळी सैनिक रविराजचे आगमन होताच त्याचे औक्षण करण्यात आले.सैनिक रविराज याने शालुट देताच आईवडीलानी त्याचे पुष्प हार घालुन स्वागत केले.तर सैनिक रविराज याने केक कानून आनंद साजरा.
यावेळी गावकर्यानी सैनिक रविराज श्रीदत्त पाटील याचे शाल, पुष्पहार घालुन भव्य सत्कार केला.
यासत्काराला गर्लगुंजीतील देसाई गल्ली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी,कार्यकर्ते तसेच ओमकार महिला स्वयहाय्य संघाच्या महिला,गावचे नागरीक,पाहुणे मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
निवृत्त शिक्षिका सौ.निला सुरेश पाटील यांचा सत्कार!
सैनिक रविराज श्रीदत्त पाटील हा ट्रेनिंग संपवुन आल्याबद्दल सत्करा करण्यात आला.कार्यक्रमाचे औचित्य साधुन मच्छे मराठी शाळेच्या शिक्षिका सौ निला सुरेश पाटील (बाळेकुंद्री) यांचा ३१ वर्षाच्या शिक्षकी सेवेतुन निवृत्त झाल्याबद्दल त्याचा शाल,पुष्पहार भेटवस्तू देऊन त्याच्या सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक निवृत्त मुख्याध्यापक एन व्ही देसाई यानी केले.तर उपस्थितांचे स्वागत शिक्षिका सौ निता पाटील यानी केले.

