संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
जांबोटी वडगाव ( ता. खानापूर ) येथील अनेक वर्षांपूर्वी बसवलेला २५ KVA क्षमतेचा विद्युत ट्रान्सफॉर्मर गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत आहे. गेल्या काही वर्षांत गावाची लोकसंख्या ५८० वरून ६०० पर्यंत वाढली आहे. तसेच शेती पंप, घरगुती वापर आणि इतर विद्युत उपकरणांची संख्याही वाढली आहे. त्यामुळे या ट्रान्सफॉर्मरवर सातत्याने भार वाढला असून वीजपुरवठा वारंवार खंडित होत आहे. कमी व्होल्टेजमुळे शेती पंप आणि घरातील उपकरणे चालत नाहीत, गावातील रस्त्यावरील दिवे मंद प्रकाश देत आहेत. कोणत्याही क्षणी ट्रान्सफॉर्मर जळून जाण्याचा धोका आहे.
तसेच गावातील वीज खांब सुमारे ४० वर्षापूर्वीचे जुने आहेत. ते पूर्णपणे जीर्ण आणि धोकादायक स्थितीत आहेत. वादळ, पावसाच्या वेळी तारा तुटून शॉर्ट सर्किट होण्याची शक्यता आहे.तेव्हा लागलीच नवीन विधुत खांब बसविण्याची मागणी ग्राम पंचायत माजी उपाध्यक्ष सुनिल देसाई व ग्रामस्थानी हेस्काॅम खात्याचे अभियंते प्रवीण बरगाले यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे
निवेदनात म्हटले आहे की,मी ग्रामपंचायत उपाध्यक्ष असताना आपल्या कार्यालयात दोन वेळा तक्रार दिली होती. ग्रामस्थही या समस्येबाबत माझ्याकडे वारंवार तक्रारी करीत आहेत. विद्यार्थ्यांचे शिक्षण आणि पिण्याच्या पाण्याचा पुरवठा पूर्णपणे विस्कळीत झाला आहे.
तेव्हा २५ KVA ऐवजी 63 KVA क्षमतेचा नवीन ट्रान्सफॉर्मर तात्काळ बसवावा.
४० वर्षापूर्वीचे जुने, जीर्ण झालेले वीज खांब काढून त्याऐवजी नवीन विदित खांब बसवावेत.अशी मागणी केली.
निवेदन देताना माजी ग्राम पंचायत उपाध्यक्ष सुनिल देसाई,जयवंत देसाई पीकेपीएस अध्यक्ष, ,सागर दळवी एडीएमसी अध्यक्ष ,आणि नामदेव देसाई,आदी ग्रामस्थ उपस्थित होते.