#सत्कार सोळ्यात दांपत्याचा सत्कार!
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
गर्लगुंजी (ता. खानापूर )गावचे सुपूत्र व लैला शुगर्सचे विक्रि विभागाचे कर्मचारी श्रीरंग वसंतराव पाटील हे २७ वर्षाच्या सेवेतुन निवृत्त झाले.त्यानिमित खानापूर
येथील वरद मंगल कार्यालयात सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गर्लगुंजी ग्राम पंचायतीचे माजी चेअरमन गोपाल पाटील होते.
तर व्यासपिठावर खानापूर तालुक्याच्या आमदार, लैला शुगर्सचे एम डी ,सत्कारमुर्ती श्रीरंग पाटील,पत्नी सौ.सुनीता पाटील, पीकेपीएस माजी चेअरमन सुभाष वसंतराव पाटील,लैला शुगर्सचे संचालक चांगापा निलजकर,
यल्लापा तिरवीर, सुब्राव पाटील,परशराम खांबले,माजी तालुका पंचायत सदस्य पांडुरंग सावंत, लैला शुगर्सचे शेतकी
अधिकारी बाळासाहेब शेलार,माजी ग्राम
पंचायत अध्यक्ष हणमंत मेलगे, परशराम चौगुले,अँड.चेतन मणेरीकर,आदी उपस्थित होते.
प्रास्ताविक नंदकुमार निट्टूरकर यानी केले.तर उपस्थितांचे स्वागत राजू सिध्दाणी यानी केले.
यावेळी उपस्थित मान्यवरांच्याहस्ते दीपप्रज्वलन व फोटो पुजन करण्यात आले.
यावेळी सत्कार मुर्ती श्रीरंग वसंतराव पाटील ,धर्मपत्नी सौ.सुनीता पाटील यांचा सपत्नीक शाल, पुष्पहार, स्मृति चिन्ह व भेटवस्तू देऊन लैला शुगर्स, कुटूंबीय,
मित्रपरिवार,आदीच्याहस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी सत्काराला उत्तर देताना सत्कारमुर्ती श्रीरंग पाटील म्हणाले की, गेल्या २७ वर्षात लैला शुगर्स मध्ये सेवा करताना सर्वाशी आपुलकीने राहुन काम सेवा बजावली.
त्यामुळे दिवस कसे गेले याचे भान राहिले.याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
यावेळी उपस्थित मान्यवरानी त्याच्या कार्याचे गोड कौतुक केले.
खानापूर तालुक्याचे आमदार बोलताना म्हणाले की, लैला शुगर्सचे कर्मचारी श्रीरंग पाटील यानी आपली सेवा प्रामाणिकपणे बजावली.आणि सेवा निवृत्त झाले.त्यांचे सेवानिवृत्ती नंतरचे जीवन सुखासमाधानाचे अशी सदिच्छा व्यक्त केली.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन नंदकुमार निट्टूरकर यानी केले.तर आभार राजू सिध्दाणी यानी मानले.

