संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
गर्लगुंजी (ता.खानापूर )गावचे सुपुत्र, माजी ग्रामपंचायत अध्यक्ष, गावपंच कमिटीतील उत्कृष्ट व्यक्तिमत्त्व, सीमा लढ्यातील खंबीर नेतृत्व आणि महाराष्ट्र एकीकरण समितीचे निष्ठावंत कार्यकर्ते फकिरा जैनु सावंत ( वय ९२) यांचे मंगळवारी दि.२८ रोजी पहाटे ५:००, वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.
त्यांच्या पश्चात चार मुलगे, चार मुली, सुना ,जावई, नातवंडे असा परिवार आहे.
त्यांची अंत्यविधी मंगळवारी दुपारी १२ वाजता गर्लगुंजी स्मशान भुमीत होणार आहे.
खानापूर चिरमुरकर गल्ली सरकारी प्राथमिक मराठी मुलांच्या शाळेचे
शिक्षक विलास सावंत यांचे वडील होत.
त्यानी मराठी भाषा, मराठी संस्कृती आणि सीमाभागातील मराठी बांधवांच्या हक्कांसाठी आयुष्यभर संघर्ष केला. महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेतृत्व करताना त्यांनी निस्वार्थपणे समाजकारण केले.आणि सीमासत्याग्रही. म्हणून त्यांची खानापूर तालुक्यात आज ओळख आहे.
गावाच्या विकासासाठी, सामाजिक ऐक्यासाठी आणि जनतेच्या प्रश्नांसाठी ते सदैव तत्पर राहिले. त्यांच्या कार्यामुळे त्यांनी गावकऱ्यांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले.
त्यांच्या जाण्याने गर्लगुंजी गावाने एक ज्येष्ठ मार्गदर्शक, समाजहितासाठी झटणारा नेता आणि सर्वसामान्यांचा आधारवड गमावला आहे. त्यांनी केलेले कार्य, विचार आणि समाजसेवेचा वारसा कायम स्मरणात राहील.