#खानापूरात सेवानिवृत्त निमित्त सत्कार सोहळा !
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
माझ्या ३१वर्षाच्या शिक्षकीसेवेच्या काळात अनेक विद्यार्थी घडविण्याचे भाग्य मिळाले, कठीण परिस्थितीतुन शिक्षण घेत आईवडील व भाऊ यानी मला मोठा आधार देत माझे शिक्षण पूर्ण केले.मला शिक्षक म्हणून सेवा करण्याची संधी मिळाली म्हणून.आज तागायत माझ्या हातुन चांगले आदर्श विद्यार्थी घडले, अनेक विद्यार्थी अधिकार पदावर कार्यरत राहिले, हेच भाग्य आहे.असे मनोगत तोपिनकट्टी गावचे सुपूत्र व ढेकोळी मराठी शाळेचे शिक्षक नारायण करंबळकर यानी खानापूरात आपल्या सेवानिवृत्त सत्कारसोहळ्यात बोलताना व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खानापूर तालुक्याचे लोकप्रिय आमदार होते.
यावेळी बोलताना नारायण करंबळकर यानी आपल्या शिक्षकीसेवेतील अनेक बरेवाईट प्रसंग व्यक्त केेले.
व्यासपिठावर प्रमुख पाहूणे म्हणून सौ.रुक्मिणी हलगेकर, श्रीमहालक्ष्मी ग्रुपचे उपाध्यक्ष विठ्ठल करंबळकर,बेळगाव तालुका शिक्षक संघटना कार्यदर्शी शेखर करंबळकर,लैला शुगर्सचे अधिकारी बाळासाहेब शेलार,एमडी सदानंद पाटील, शिक्षक संघटनेचे उपाध्यक्ष के.एच कौदलकर, कार्यदर्शि बी बी चापगावकर,माजी अध्यक्ष वाय एम पाटील, मुख्याध्यापक एस एन कम्मार,अँड. सिध्दार्थ कपलेश्वरी , मल्लापा मारीहाळ,भरमाणी पाटील, निवृत्त मुख्याध्यापक एन एम पाटील,व सत्कार मुर्ती एन एम करंबळकर सपत्नीक आदी उपस्थित होते.
प्रास्ताविक हणमंत करंबळकर यानी केले.तर उपस्थितांचे स्वागत के.जी.कुंभार यानी
कार्यक्रमाची सुरूवात उपस्थित पाहुण्याच्या हस्ते दीप प्रज्वलन व फोटो पुजनाने झाली.
यावेळी वर्ग मित्र, सहशिक्षक, विद्यार्थी आदीनी सत्कारमुर्ती नारायण करंबळकर यांच्या शिक्षकी सेवेतील कार्याबद्दल गौरव उदगार काढले.
यावेळी सत्कारमुर्ती नारायण करंबळकर यांचा सपत्नीक कुटू्बाच्यावतीने तसेच आमदार व विविध शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक,वर्ग मित्र,विविध संघटना, नातेवाईक आदीच्याहस्ते शाल , पुष्पहार, पुष्पगुच्छ व भेट वस्तु देऊन सत्कार करण्यात आला.
शेवटीकार्यक्रमाचे अध्यक्ष खानापूर तालुक्याचे आमदार बोलताना म्हणाले की, मोठ्या कष्टाने शिक्षण घेऊन शिक्षकी सेवा केली.३१ वर्षे शिक्षकी सेवा करून नारायण करंबळकर यानी अनेक विद्यार्थी घडविले हे त्याचे भाग्यच आहे.तोपिनकट्टी गावात मोजकेच शिक्षक झाले होते ते ही करंबळकर घराण्यातच शिक्षकाची संख्या जास्त होती.असे सांगुन त्याचे उर्वरीत आयुष्य समाधानाचो जावो.अशी सदिच्छा व्यक्त केली.
यावेळी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार एल व्ही गुरव यानी मानले.


