#खानापूरात सेवानिवृत्त निमित्त सत्कार सोहळा !
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
माझ्या ३६ वर्षाच्या शिक्षकीसेवेच्या काळात कोणत्या संपत्तीची, मोटारगाडीची अपेक्षा केली नाही.केवळ विद्यार्थी हीच खरी संपत्ती होती.आज तागायत माझ्या हातुन चांगले आदर्श विद्यार्थी घडले, अनेक विद्यार्थी अधिकार पदावर कार्यरत राहिले, हीच खरी संपत्ती राहिली.असे मनोगत खानापूर मराठा मंडळ हाय्यर सेकंडरी स्कूलचे गणित विषयाचे शिक्षक एस डी गुरव यानी खानापूरात आपल्या सेवानिवृत्त सत्कारसोहळ्यात बोलताना व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खानापूर लक्ष्मीयात्रोत्सव कमिटीचे अध्यक्ष नामदेव गुरव होते.
यावेळी बोलताना एस डी गुरव यानी आपल्या शिक्षकीसेवेतील अनेक बरेवाईट प्रसंग व्यक्त केेले.
व्यासपिठावर प्रमुख पाहूणे म्हणून अर्बन बँक चेअरमन अमृत शेलार, माजी जिल्हा पंचायत सदस्य जोतिबा रेमाणी, निवृत्त मुख्याध्यापक व्ही.बी.होसुर, मोहन गुरव, एन जी गुरव, व सत्कार मुर्ती एस डी गुरव सपत्नीक आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरूवात उपस्थित पाहुण्याच्या हस्ते दीप प्रज्वलन व फोटो पुजनाने झाली.
यावेळी वर्ग मित्र, सहशिक्षक, विद्यार्थी आदीनी सत्कारमुर्ती एस डी गुरव यांच्या शिक्षकी सेवेतील कार्याबद्दल गौरव उदगार काढले.
यावेळी सत्कारमुर्ती एस डी गुरव यांचा सपत्नीक कुटू्बाच्यावतीने तसेच विविध शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक,वर्ग मित्र,विविध संघटना, नातेवाईक आदीच्याहस्ते शाल , पुष्पहार, पुष्पगुच्छ व भेट वस्तु देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन गोविंद पाटील यानी केले.तर आभार प्रा. शंकर गावडा यानी मानले.
