संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
अलिकडे निसर्गाचा समतोल ढासळत चालला आहे.निसर्ग टिकवायचा असेल व पाऊस पडायचा असेल तर प्रत्येकाने एक तरी झाड लावुन ते झाड जोपसले पाहिजे.यासाठी आपल्या आईच्या नावे झाड लावुन त्याची निगा राखा.
तसेच सोसायटीच्या आवारात वृक्षारोपण निमित्त लावण्यात आलेल्या रोपाची सोसायटीच्या कर्मचार्यानी काळजी घेऊन ती वाढवा.असे मत चौराशी देवी सौहार्द सोसायटीचेअरमन डाॅ.डी . ई.नाडगैडा यानी सोमावारी दि.२९ रोजी केंद्र सहकार मंत्रालयाच्या ५व्या वर्धापन दिनानिमित्त सहकार सप्ताहाचे औचित्य साधुन वृक्षारोपण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना व्यक्त केले.
प्रारंभी सौहार्द डेव्हलपमेंट आँफिसर विनोद मराठा यांच्याहस्ते रोप लावुन वृक्षरोपऩ कार्यक्रमाचे उदघाटन केेले.
यावेळी ,चेअरमन डाॅ.डी.ई .नाडगौडा,व्हाईस चेअरमन शिवाजी देसुरकर, संचालक विश्वास देसाई मॅनेजर श्री काकतकर ,कर्मचारी व सभासद इतर मान्यवर उपस्थित होते.
प्रास्ताविक मॅनेजर श्री काकतकर यानी करून उपस्थितांचे स्वागत केेले.
यावेळीउपस्थित मान्यवरांच्याहस्ते दीप प्रज्वलन व फोटो पुजन करण्यात आले.
तर उपस्थित मान्यवरांचा शाल व रोप देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी उपस्थित मान्य़वरांची भाषणे झाली.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार मॅनेजर श्री.काकतकर यानी मानले.

