#मराठा मंडळ कन्व्हेन्शन हाॅल येथे बुधवारी दि.१ जुैल रोजी सकाळी ११ वाजता निरोप समारंभ!
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
खानापूर तालुक्याचे बी.ई.ओ. पी.रामाप्पा हे आज मंगळवारी दि.३० जुन रोजी शिक्षण. खात्यातुन ३५ वर्षाच्या विविध पदावर प्रामाणिक ,उल्लेखनीय,शैक्षणिक सेवा करून बी ई ओ पदावरून निवृत्त होत आहेत.
या सेवानिवृत्ति निमित्त त्यांचा सत्कार सोहळा उद्या बुधवारी दि १ जूलै रोजी सकाळी ११ वाजता खानापूर मराठा मंडळ कन्व्हेन्शन हाॅल ये थे होणार आहे.
कार्यक्रमाच्या अध्य़क्षस्थानी खानापूर तालुक्याचे आमदार उपस्थित राहणार आहेत.यावेळी दीप प्रज्वलन तहसीलदार दुंडाप्पा कोमार यांच्याहस्ते होणार आहे.तर प्रमुख पाहुणे म्हणून सह संचालक वृषभेंद्रय्या , डी डी पी आय श्रीमती लीलावती हिरेमठ, मन्नूरचे डाईट प्राचार्य उदय होनकुप्पी,जिल्हा आक्षरदासोह अधिकारी लक्ष्मण यक्कुंडी , तालुका पंचायत कार्यनिर्वाहक अधिकारी रमेश मेत्री आदी उपस्थित राहणार आहेत.
बीईओ कार्यालय, बीआरसी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यामाने होणार्या कार्यक्रमाला तालुक्यातील प्राथमिक,माध्यमिक मुख्याध्यापक, शिक्षकासह बी ई ओ पी रामाप्पा यांच्या सेवेचा गौरव करण्यात येणार आहे.
बी ई ओ पी.रामाप्पा यानी सहशिक्षक,
मुख्याध्यापक नंतर बीईओ म्हणून शिक्षण क्षेत्रात मोठ्या मोलाचे योगदान दिले आहे आपल्या सेवाकाळात मिळालेल्या
सहकार्याबद्दल सर्वअधिकारी,
मुख्याध्यापक,शिक्षक , हितचिंतक, व शिक्षणप्रेमीचे आभार मानत आपल्या सेवानिवृत्ती सत्कार सोहळ्याला उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
